Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Nashik News: नाशिक शहरातील सातपूर परिसरात मागील आठ दिवसांपासून महावितरणच्या विद्युत वितरण पेट्यांमधील (डीपी) फ्युज चोरीला जाण्याचे प्रकार समोर येत आहेत. महिला चोरट्यांची एक टोळी दररोज सुमारे १०० लहान-मोठ्या डीपींमधून फ्युज चोरत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 10, 2026 | 01:31 PM
नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Follow Us
Follow Us:
  • महावितरणाचे दररोज १०० फ्यूज चोरीला
  • महात्मा नगर, कॉलेज रोड परिसरात टोळी सक्रिय
  • सातपूरकर तासनतास अंधारात
नाशिक: नाशिक शहरातील सातपूर विभागामध्ये येणाऱ्या विविध परिसरांमध्ये मागील आठ दिवसांपासून महावितरणच्या डीपींमधून (ट्रान्सफॉर्मर) फ्युज चोरीला जाण्याचा अत्यंत गंभीर प्रकार सुरू आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना तासनतास अंधारात राहावे लागत असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सातपूर हा प्रमुख औद्योगिक आणि दाट लोकवस्तीचा निवासी भाग असल्याने येथे डीपींची संख्या लक्षणीय आहे. याच बाबीचा गैरफायदा घेत चोरट्या महिलांच्या एका टोळीने दररोज सकाळी किमान १०० लहान-मोठ्या डीपींमधून फ्युज अनधिकृतपणे काढून लंपास करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने ऐन उन्हाच्या तडाख्यात नागरिकांना वीजपुरवठा खंडित होण्याचे संकट सहन करावे लागत आहे. (Nashik News)

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

या गंभीर प्रकाराची दखल घेत महावितरण प्रशासनाने स्थानिक पोलीस ठाण्यांना तातडीने पत्र देऊन चोरट्या महिलांच्या टोळीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच, नागरिकांना आपल्या परिसरात असे संशयास्पद प्रकार किंवा भंगार गोळा करणाऱ्या महिला डीपीजवळ दिसल्यास त्यांना त्वरित रोखावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक अशा संशयितांना पकडून थेट पोलिसांच्या स्वाधीन करू शकतात किंवा महावितरणच्या ७८७५७६६४४२, ७८७५७६६४४३ आणि ७८७५७६६४४६ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधून तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव

सकाळी चोरी, सायंकाळी परिसरात अंधार

महावितरणच्या अधिकाऱ्याऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथुज चोरीचे हे प्रकार प्रामुख्याने सकाळी घडतात. मात्र, सकाळी नागरिक नौकरी व कामधंद्यानिमित्त घराबाहेर पडलेले असतात, तर काही नागरिक वीज यंत्रणेचे काही दुरुस्ती काम सुरू असावे, या गैरसमजातून त्वरित तक्रार करत नाहीत, परिणामी, सायंकाळी ५ वाजेनंतर नागरिक घरी परतल्यानंतर वीज गेल्याच्या तक्रारीचा महावितरणकडे अचानक ओघ वाढतो. महावितरणकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळात एकाच वेळी अनेक भागांत नवे फ्युज बसवून वीजपुरवठा पूर्ववत करताना कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होत असून, यात अनेक तासांचा कालावधी निघून जात आहे.

या परिसराला बसतोय मोठा फटका

फ्युज चोरीच्या या सत्रामुळे महात्मा नगर, वावरे लेन, अद्वैत कॉलनी, मॉडेल कॉलनी, श्रमिक कॉलनी, उदय नगर, डिसोझा कॉलनी, एसटी कॉलनी, माणिक नगर, व्हीसे मळा, आर्किटेक्ट कॉलनी, विश्वास बँक परिसर, सावरकर नगर आणि कॉलेज रोड या प्रमुख भागांना मोठा फटका बसला असून, येथे अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. उन्हाची तीव्रता वाढली असतानाच या घटना वाढल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने बंद; सिंहस्थ कुंभमेळ्याआधी प्रशासनाचा निर्णय

Web Title: Nashik satpur mahavitaran dp fuse theft women gang power cut electricity supply disrupted sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • crime
  • electricity
  • Nashik

संबंधित बातम्या

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
1

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव
2

Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
3

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.