Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी तरुणाचा खून; विम्याच्या पैशांसाठी रचला थरारक कट, पोलिसांचा मोठा खुलासा

जालना जिल्ह्यात कार जळून व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात मानली जात होती. मात्र पोलिस तपासात हा नियोजनबद्ध खून असल्याचे उघड झाले. विम्याची रक्कम आणि कर्जातून सुटका मिळवण्यासाठी नितीन गवळीने एका तरुणाचा खून करून मृतदेह कारमध्ये जाळल्याचा आरोप आहे. दोन आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 02, 2026 | 10:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कार जळण्याची घटना अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचे तपासात निष्पन्न.
  • विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आणि कर्जातून सुटकेसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचा आरोप.
  • दोन आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधार नितीन गवळीचा शोध सुरू.
जालना: जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 31 मे 2026 रोजी एका कारचा अपघात झाला होता. अपघातावेळी कारला आग लागली होती. आणि या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा प्रकार अपघाताची वाटत असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, जालना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपासानंतर या घटनेमागील अत्यंत धक्कादायक सत्य समोर आली आहे. हा प्रकार अपघात नसून एक नियोजनबद्ध हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

काय नेमकं प्रकरण?

नितीन प्रभाकर गवळी असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याने हा सगळा प्रकार विम्याची मोठी रक्कम मिळवण्यासाठी आणि कर्जाच्या विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. या कटासाठी त्याने अमित राजू फुलारे आणि आकाश गवळी या दोघांना सोबत घेऊन नाशिक येथील संदीप चौहाण या तरुणाचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. त्यानंतर संदीपचा मृतदेह कारमध्ये ठेवून तो वाहनासह जाळून टाकण्यात आली. जेणेकरून मृतदेह नितीनचाच आहे असे सगळ्यांना वाटेल.

Uttarpradesh Crime: शेजाऱ्याची हैवानीयत! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित गर्भवती

या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावतांना जाफ्राबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (1), 62 (2) (अ), 238 (अ) (ब) व 3 (5) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य सूत्रधार नितीन प्रभाकर गवळी याचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक काम करत आहे. सदर गुन्ह्यातील जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सध्या डीएनए तपासणीची प्रक्रिया सुरू आहे.

दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्घृण हत्या; जालन्यात खळबळ

जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्गुण हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. हा घडलेला प्रकार मंठा शहरातील जवाहरलाल कॉलनी परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे.

चोरीच्या आरोपावरुन दलित मुलीला गावभर फिरवलं, झाडाला बांधून केली बेदम मारहाण; आरोपीवर तक्रार दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिस तपासात नेमके काय उघड झाले?

    Ans: कारला लागलेली आग अपघात नसून विम्याच्या पैशांसाठी रचलेला खुनाचा कट असल्याचे समोर आले.

  • Que: आरोपींनी हा कट का रचला होता?

    Ans: विम्याची मोठी रक्कम मिळवणे, कर्जातून मुक्त होणे आणि वैयक्तिक अडचणींपासून सुटका मिळवणे हा उद्देश होता.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी नितीन गवळीचा शोध सुरू आहे. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे.

Web Title: Jalna crime young man murdered to fake killers own death thrilling plot hatched for insurance payoutmajor police revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
3

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.