Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: ‘पोहता येत नाही’ माहिती असूनही पाण्यात उतरवलं; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू

जालन्यातील अंबड येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय प्रीती भाकड हिचा खदाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोहता येत नसतानाही तिला सरावासाठी पाण्यात उतरवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी प्रशिक्षण अकादमीचे संचालक आणि ट्रेनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 07, 2026 | 11:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा खदाणीतील पाण्यात बुडून मृत्यू.
  • पोहता येत नसतानाही पाण्यात उतरवल्याचा कुटुंबीयांचा आरोप.
  • अकादमी संचालक आणि ट्रेनरविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल.
जालना: जालन्यातील अंबड तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा खदाणीतील खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, पोलीस भरती प्रक्रियेत पोहण्याची कोणतीही अट नसतानाही प्रशिक्षण अकादमीकडून तिला पाण्यात उतरवण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशिक्षण केंद्राच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Satara Crime: कराडमध्ये अभियंत्याचा ‘अपघात’ नव्हे तर कट! पत्नी आणि मेहुण्यानेच रचला घातपात; CCTV समोर

काय घडलं नेमकं?

प्रीती भाकड असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रीती नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे अकादमीच्या इतर विद्यार्थ्यांसोबत शारीरिक सरावासाठीअंबड शहराच्या जवळील वलखेडा शिवार येथील खंडण परिसरात गेली होती. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पोहण्याची कोणतीही अट किंवा अनिवार्य सराव नसतानाही अकादमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश भागवत वायसे यांनी प्रीतीला खदाणीच्या खोल पाण्यात उतरण्यास भाग पाडले.प्रीतीला पोहोत येत नव्हते. याची माहिती प्रशिक्षण देणाऱ्यांना होती तरीही पाण्यात उतरायला लावले. पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने प्रीती बुडू लागली, तिला वाचवण्याचा सहकाऱ्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.हा मोठा निष्काळजीपणा असल्याचे समोर आले आहे.

प्रीतीला तात्काळ अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याची घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. प्रीतीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी प्रीतीचे वडील अंशीराम एकनाथ भाकड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात अकादमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश भागवत वायसे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 105 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Baramati Accident: भीषण अपघात! इलेक्ट्रिक स्कुटीला आयशरची जोरदार धडक; दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू तर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय होते?

    Ans: मृत तरुणीचे नाव प्रीती भाकड असे होते.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जालन्यातील अंबड तालुक्यातील वलखेडा शिवारातील खदान परिसरात ही घटना घडली.

  • Que: पोलिसांनी कोणाविरोधात गुन्हा दाखल केला?

    Ans: अकादमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश वायसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Jalna crime young woman preparing for police recruitment dies after being made to enter the water despite it being known that she did not know how to swim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.