crime (फोटो सौजन्य: social media)
जालना जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांनी मिळून एका दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाची गळा आवळून हत्या केली. ही घटना आदिवासी आश्रम शाळेत घडली आहे. शाळेच्या मैदानात त्यांच्यात वाद झाला. याचा बदला घेण्यासाठी या अल्पवयीन मुलांनी डाव आखून खून केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलांनीच अल्पवयीन मुलाचा खून केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणी खून केलेल्या विध्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे गणपती इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खेळाच्या मैदानात वाद झाला. अजय यावर या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा तिसरीतल्या विद्यार्थ्यांसोबत भांडण झाला होता. अजय पवार याची बहीण गौरी सुद्धा याच शाळेत शिकते. वाद झाल्यानंतर हे सर्व विध्यार्थी शाळेच्या अधिवासी आश्रम शाळेच्या वस्तीगृहात गेले. संध्याकाळचे जेवण ही अजय ने याच वसतिगृहात केले. त्यानंतर तो झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेला. तो पर्यंत तो व्यवस्थित होता.
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली पण अजय हा झोपेतून उठत नव्हता. त्याला वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. त्याचा श्वास बंद झाला होता. त्यामुळे ते कर्मचारी घाबरले. त्यांनी वसतिगृह प्रशासनाला ही माहिती कळवली. लागलीच ही बाब पोलिसांना ही सांगण्यात आली. पोलिसही वसतिगृहात दाखल झाले. अजयला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषीत केलं.
यावेळी अजयच्या गळ्यावर खुणा दिसत असल्याने मुलाचा खून झाला असावा असा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त केला. पोलिसांनी या संशयाला ग्राहय धरत अधिक तपस सुरु केले. चौकशी केल्यानंतर मैदानात वाद झाल्याची बाब पोलिसांना समजली. त्यांनी त्या संबंधित दोन विद्यार्थ्यांकडे चौकशी केली. हे दोन्ही विध्यार्थी तिसरीत शिकतात. त्यांना विश्वासात घेतल्यांनंतर त्यांनी झालेला हा प्रकार सांगितला. त्यांनी सांगितले अजय रात्री झोपेत असतांना आपण त्याचा गेला आवळल्याचं या दोन्ही विद्यार्थ्यांनी सांगितलं.
पोलिसांनी हत्या केलेल्या तिसरीत शिकणाऱ्या दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण जालना जिल्हा हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पती ठरत होता प्रेमात अडसर; पत्नीने प्रियकराच्या मदतीने आधी हत्या केली
दरम्यान, मुंबईच्या नालासोपारीतून हत्येची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पती प्रेमात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. त्यानंतर दृश्यम स्टाईलने मृतदेह घरातच पुरल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. पेल्हार पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला पुणे येथून अटक केली आहे. हत्या करण्यात आलेल्या आरोपींची नाव गुडिया चमन चौहान आणि मोनू विश्वकर्मा असे आहे. मोनू हा गुडियाचा प्रियकर आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव विजय चौहान असे आहे. विजय आणि गुडिया या दाम्पत्याला चेतन चौहान नावाचा आठ वर्षांचा मुलगा देखील आहे.