Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासन आमच्या खिशात; भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यावर भावजईने धमकी दिल्याचा केला आरोप,

भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके यांच्यावर भावजईने आरोप केले. परिणय फूकेचे गुंडे दररोज मला धमकावले जात आहे. देवेंद्र फडणवीसांनी देखील मदत केली नाही. असा आरोप प्रिया फुके यांनी केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2025 | 02:03 PM
parinay fuke (फोटो सौजन्य: social media )

parinay fuke (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार परिणय फुके यांच्या भावजईने आरोप केले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहे. काय आरोप केले आहेत परिणय फुके यांचे भावजई प्रिया फुके यांनी बघुयात?

कोलापुरात माजी उपसरपंच ग्रामपंचायतीत आले, लिपिकाला मारहाण केली आणि…; घटना CCTV मध्ये कैद

भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून गुंडे मला दररोज धमकावले जात आहे. मी दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मी याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनीही मला ‘बघतो बघतो’ सांगण्यापलीकडे कोणतीही मदत केली नाही, असा गंभीर आरोप परियण फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नीने केला आहे. संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे उपस्थित होत्या. या पत्रकार परिषदेत प्रिया फुके यांची परिणय फुके यांच्यावर गंभीर आरोप केले.

मी माझा लाडक्या भावांना मदत मागितली, पण मला मदत मिळाली नाही, माझा सोबत उभं राहायला कोणी उभं राहिलं नाही. संकेत फुके यांच्यासोबत माझं 2012 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर संकेत फुके यांना आजार झाला होता. त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. माझी फसवणूक करुन हे लग्न झाले होते. माझ्या पतीला घेऊन आम्ही उपचारासाठी मुंबईला आलो होते. 2022 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी घरात माझ्या पतीचा पैशांचा कारभार, त्यांच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारले. तेव्हा ‘तू कोण आहेत?’, ‘तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे?’ असे विचारत मला रात्री 10 वाजता घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मला जीवे मारुन टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारुन टाकू, असे मला धमकावण्यात आले. मला दोन लहान मुलं आहेत. मी गेल्या दीड वर्षांपासून आईच्या घरी राहत आहे.

माझा हक्क मिळवण्यासाठी रोज पोलीस ठाण्यात चकरा मारत आहे. मला मारण्यासाठी अनेकदा गुंड येतात, त्यांच्या बॅगेत जड वस्तू असतात. आताही पत्रकार परिषदेला येतान माझ्या मागे दोन माणसं होती, ती कोण होती, हे मला माहिती नाही. माझ्यावर अॅट्रोसिटी, खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजी-आजोबांनी कोर्टात केस करुन माझ्या मुलांची कस्टडी मागितली आहे. मुलांची आई जिवंत असताना ते कस्टडी कशी मागू शकतात? मी हक्क मागतेय माझा, मी कोणताही त्रास दिला नाही. मात्र, काहीतरी करुन आम्हाला दाबायचा प्रयत्न होत आहे, असा आरोप प्रिया फुके यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांनीही मदत केली नाही

मी या सगळ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले होते. त्यांना संपत्तीत आमचा हक्क असल्याची कागदपत्रं दिली होती. पण देवेंद्र फडणवीसांना आजपर्यंत कधीही हस्तक्षेप केला नाही. बघतो, बघतो, असे ते दरवेळी सांगत राहिले. मी त्यांना मेसेजही केले होते. मी त्यांना प्रत्यक्षात चारवेळा भेटून ही परिस्थिती सांगितली आहे. त्यांना सगळं माहिती असूनही ते काही करत नाहीत. मी महिला आयोगाकडे 2024 साली याविरोधात तक्रार केली होती. पण महिला आयोगानेही मला मदत केली नाही, असे प्रिया फुके यांनी म्हटले. मला दोन लहान मुलं आहेत. पोलीस ठाण्यात मला सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बसवून ठेवले जाते, असाही आरोप त्यांनी केला.

मला धमक्या दिल्या जातात की, न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासन आमच्या खिशात आहे. तुझा आवाज कधीच लोकांपर्यंत पोहोचणार नाही. 20 वर्षे गेली तरी तुझी केस कोर्टात येणार नाही, असे अगतिक उद्गार प्रिया फुके यांनी पत्रकार परिषदेत काढले.

Mulshi Crime News: ‘ती महिला मुळशीतील पोरांना मुली पुरवते..!’ धनश्री चौंधेंचा धक्कादायक खुलासा

Web Title: Judiciary police and administration in our pocket bjp mla parinay phuke accused of threatening by brother in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
1

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
2

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या
3

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
4

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.