'ती महिला मुळशीतील पोरांना मुली पुरवते..!' धनश्री चौंधेंचा धक्कादायक खुलासा
Mulshi Crime News: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात, दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे जवळपास सहा-सात दिवस फरार होते. या सहा-सात दिवसांच्या काळात राजेंद्र हगवणे अनेक ठिकाणी फिरले. मुळशीतील चौंधे कुटुंबाने त्यांना थार दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. पण आता चौंधे कुटुंबातही सुनेचा छळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सुयश चौंधेच्या पत्नी धनश्री चौंधे यांनी धक्कादायक खुसाले केले आहेत. याचवेळी त्यांनी मुळशीत सुरू असलेला धक्कादायक प्रकाराची भांडाफोड केला आहे. मुळशीतील शीतल उभे नावाची महिला तेथील पोरांना मुली पुरवते असा दावा धनश्री चौंधे यांनी केला आहे. “शीतल उभे नावाच्या एका महिलेकडून त्यांना मुलींचे फोटो पाठवले जात असत. ते त्यातून निवड करून सांगत. त्यांना मुलींचा फारसा नाद होता. शीतल उभे ही महिला मुली पाठवत असल्याची माहिती मला होती. मी मोबाईलमध्ये ते फोटो स्वतः पाहिले होते. हे सर्व पाहिल्यानंतर मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता.”असंही धनश्री यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींना काळे फासण्याची ठाकरे गटाच्या नेत्याकडूनच थेट धमकी; दगडफेक करण्याचेही म्हटलं…
वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर सुरू झालेल्या तपासामध्ये, हगवणेंना मदत करणाऱ्यांपैकी काही आरोपी त्यांच्या घरात महिलांचा छळ करत असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सुयश चौंधे याच्या पत्नीने शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार केली आहे. नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चौंधे, सासरे नरेश चौंधे आणि सासू वैशाली चौंधे यांच्या विरोधात पोलिस आणि महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, संबंधित यंत्रणांनी या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
चौंधे कुटुंबावर आरोप करणाऱ्या सूनेने छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिने चौंधे कुटुंबातील सदस्यांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यापैकी, सासू काळी जादू करते, असा एक गंभीर आरोप तिने केला आहे. लग्नात दोन लाख रुपये हुंडा आणि दोन तोळे सोनं दिल्यानंतरही, लग्नानंतर सातत्याने पैशांची मागणी होत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. त्यातून तिला मारहाण करण्यात येते आणि मानसिक छळ सहन करावा लागतो, असेही तिने स्पष्ट केले आहे.
यश चौंधे यांच्या पत्नीने गंभीर आरोप करत सांगितले की, सासरकडून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. घरामध्ये वारंवार वाद होत असत. सुयश चौंधे सकाळपासून रात्रीपर्यंत दारूचे व्यसन करत आणि मुलींना घेऊन फिरणे हेच त्यांचे दैनंदिन जीवन झाले होते. सासू, सासरे, दीर आणि नवरा सर्वजण तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. या संदर्भात तिने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, तिकडून देखील कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप तिने केला आहे. चौंधे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याचेही तिने नमूद केले. सुयश चौंधे यांच्या आईने गावात उपसरपंच पद भूषवले असून, पूर्वी निवडणुका देखील लढल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाची पकड स्थानिक राजकारणात असल्याचे स्पष्ट होते.