राज्यात 443 लाचखोर गजाआड, शासकीय कार्यालयांना लाचखोरीची वाळवी
कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव ग्रामपंचायतीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी उपसरपंचाकडून ग्रामपंचायतीतील लिपिकाला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. ग्रामपंचायतच्या मालकीच्या गाळ्याचे भाडे मागितल्याने ही मारहाण झाल्याची समोर आली आहे. ग्रामपंचायत येथील माजी पधाधिकाऱ्याकडून असा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
लोणावळ्यात सिनेस्टाईल रॉबरीन खळबळ! 20-22 जण टेम्पोतून आले, वॉचमनला बांधलं, तलवारी नाचवल्या आणि…
नेमकं काय घडलं?
ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक सागर पाटील काम करत असून त्यांनी ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्याचे भाडे मागितले होते. यावरून माजी उपसरपंच अजित पाटील यांनी संतापून लिपिकाला बेदम मारहाण केली. नंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. ग्रामपंचायत कार्यालयात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
ग्रामपंचायतच्या मालकीच्या गाळाचे भाडे मागितल्यानंतर माजी उपसरपंच अजित पाटील संतापाने थेट कार्यालयात घुसले. त्यांनी लिपिक सागर पाटीलला मारहाण केली. नंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. या मारहाणेची साधी पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीच्या गाळ्याचे भाडे मागितल्याने माजी उपसरपंचाने कार्यालयात येऊन केलेल्या मारहाणीनंतर माजी उपसरपंच अजित पाटीलवर काही कारवाई होणार की नाही? हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. या घटनेची सध्या गावात चांगलीच चर्चा असून ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कायदा हातात घेतला जात असेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं असा सवाल उपस्थित होत आहे.
Mulshi Crime News: ‘ती महिला मुळशीतील पोरांना मुली पुरवते..!’ धनश्री चौंधेंचा धक्कादायक खुलासा