Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Dharashiv Crime News : कळंब पोलीस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल 36 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस अंमलदाराला रंगेहात पकडण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 12, 2026 | 06:03 PM
कळंब पोलीस ठाण्यात ACBची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

कळंब पोलीस ठाण्यात ACBची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Follow Us
Follow Us:

Dharashiv Crime News Marathi : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जालना पथकाने कळंब शहरात मोठी सापळा कारवाई करत पोलिस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणामुळे धाराशिव जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा कळंब येथे “रिलॅक्स स्पा सेंटर” व्यवसाय असून तो सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कळंब पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार अशोक दादाराव करवर आणि सिद्धेश्वर प्रकाश शिंदे यांनी दरमहा हप्त्याची मागणी केल्याची तक्रार १० मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षकांसाठी २० हजार रुपये आणि दुय्यम अधिकाऱ्यांसाठी २० हजार रुपये, असे एकूण ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच “अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केल्यास स्पा सेंटर बंद करून कारवाई करण्यात येईल,” अशी धमकीही दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

त्यानंतर लाचलुचपत विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर शिंदे यांनी २० हजार रुपये तर अशोक करवर यांनी १६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ११ मे रोजी सापळा रचण्यात आला. कळंब शहरातील होळकर चौकातून तांदळवाडी रोडकडे जाणाऱ्या मार्गावरील “गुलमोहर बिर्याणी हाऊस” समोर तक्रारदाराच्या स्विफ्ट कारमध्ये पोलिस अंमलदार अशोक करवर याला ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा पथकाने रंगेहाथ पकडले.

आरोपीच्या अंगझडतीत ३६ हजार रुपयांची लाचेची रक्कम, ३५० रुपये रोख, मोबाईल फोन तसेच कार व दुचाकीच्या चाव्या जप्त करण्यात आल्या. दुसरा आरोपी सिद्धेश्वर शिंदे याचा शोध सुरू असून दोन्ही आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक बाळू संपती जाधवर यांनी केले. तपासाची जबाबदारी पोलिस निरीक्षक विजय वगरे यांच्याकडे देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ तक्रार करावी. टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ९७६४०२१०६४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NEET पेपरफुटीचा ‘नाशिक’ पॅटर्न उघड! हरियाणा ते बिहार पसरले धागेदोरे; नाशिकमधून ३० वर्षीय संशयिताला अटक

Web Title: Kalamb police station acb action police officer caught taking bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • police

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा
2

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.