नाशिकमधून ३० वर्षीय संशयिताला अटक (Photo Credit- X)
NEET पेपरफुटीच्या प्रवासाचा मार्ग आता समोर आला आहे. नाशिकमध्ये छपाई होण्यापूर्वीच हा पेपर फुटला होता. नाशिकहून हा फुटलेला पेपर हरियाणातील गुरुग्राम येथे नेण्यात आला. हरियाणात, या फुटलेल्या पेपरचे १० संच (सेट्स) तयार करण्यात आले. हरियाणानंतर, हा पेपर राजस्थानमधील जयपूर येथे पोहोचला. जयपूरहून तो जमवा रामगड आणि त्यानंतर सिकर येथे गेला. अखेरीस, हा फुटलेला पेपर जम्मू-काश्मीर, बिहार आणि केरळपर्यंत पोहोचला. केरळनंतर, तो आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पोहोचला.
On inputs from Rajasthan Police, the Nashik City Crime Branch arrested a youth named Shubham Khairnar from the Indira Nagar area in connection with the NEET paper leak case, and he will be handed over to Rajasthan Police, which will further transfer him to the CBI: Nashik Police pic.twitter.com/6PA6Jj7Yc0 — IANS (@ians_india) May 12, 2026
नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ ने तांत्रिक विश्लेषण आणि फोटोंच्या मदतीने अवघ्या एका तासात ३० वर्षीय संशयित आरोपीला अटक केली. हा आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगावचा रहिवासी असून तो BAMS च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. अटक टाळण्यासाठी त्याने आपले डोके मुंडवून वेशभूषा बदलली होती. नाशिक पोलीस या आरोपीला पुढील तपासासाठी राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.
केंद्र सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संपूर्ण तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला आहे. सीबीआय लवकरच या प्रकरणी नियमित गुन्हा दाखल करून विशेष पथकाची स्थापना करणार आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SOG) सर्व कागदपत्रे आणि पुरावे सीबीआय आपल्या ताब्यात घेणार आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) परीक्षेचे सर्व रेकॉर्ड्स तपासले जातील.
३ मे २०२६ रोजी झालेली ‘NEET-UG 2026’ परीक्षा केंद्र सरकारने अधिकृतपणे रद्द केली आहे. या निर्णयामुळे सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेचा बोजा पडणार असला तरी, पारदर्शकता राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच लक्ष द्यावे.






