Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; गावठी दारू भट्ट्या केल्या उद्ध्वस्त

हडपसरमधील काळेपडळ भागात वडाचीवाडी येथील हातभट्टीच्या अड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापेमारी केली. दोघांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 08, 2024 | 05:00 PM
काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; गावठी दारू भट्ट्या केल्या उद्ध्वस्त

काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; गावठी दारू भट्ट्या केल्या उद्ध्वस्त

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : हडपसरमधील काळेपडळ भागात वडाचीवाडी येथील हातभट्टीच्या अड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल ४ हजार ३४० लिटर गावठी दारू तसेच दारू तयार करण्यास लागणारे १२ हजार लिटरचे रसायन असा ९ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर, दोघांना अटक केली आहे.

जगदीश भैरूलाल प्रजापती (२४, रा. काळेपडळ), गुलाब संपकाळ रचपूत (३३, रा. होळकरवाडी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक अनिल निंबाळकर यांच्यासह पथकाने केली.

शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. तरीही शहरात छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे वारंवार दिसून येत आहे. यादरम्यान, काळेपडळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमित शेटे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान वडाचीवाडी येथील वड्यालगत दोघेजण गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून या भागात छापा टाकला. त्यावेळी प्रजापती, रचपुत या दोघांना ताब्यात घेतले. येथून पोलिसांनी तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले १२४ कॅन व १२ हजार लिटर कच्चे रसायन, दोन मोबाईल असा ९ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांची छापेमारी; कपड्यांसह ३५ लाखांच्या वस्तू जप्त

गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त

गावठी दारू भट्ट्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना गावठी दारुची विक्री केली जात आहे, आता पोलिसही अशा भट्ट्यांवर लक्ष देऊन आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्याखाली जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जवळार्जून गावच्या नदी पात्रात बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्याची भट्टी उद्ध्वस्त केली होती. या कारवाईत सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचे दारू तयार करण्यासाठीचे साहित्य नष्ट करण्यात आले, अशी माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळार्जून गावच्या हद्दीत सालोबा मळ्यात नदीच्या पात्रात झुडपात बेकायदेशीररित्या गावठी दारूभट्टी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी या दारुभट्टीवर छापा टाकला. यावेळी दारू तयार करण्यासाठी लागणारे अंदाजे २ लाख ६० हजार रुपये किंमतीचे दोन लोखंडी पातेले,१३ हजार लिटर कच्चे रसायन, ५२५ लिटर तयार दारू,प्लास्टिक कांड, सरपन आदी साहित्य जप्त केले.

Web Title: Kalepadal police have raided the village liquor factory and taken action nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
1

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
2

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
4

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.