कराडच्या हेळगावात रस्त्याच्या वादातून कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; २८ वर्षीय तरुणाचा खून
रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हेळगाव येथील प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोर रस्त्याच्या वादातून हा प्रकार घडला.फिर्यादीतील आरोपानुसार, श्रीमंत रामचंद्र सूर्यवंशी हा कुराड, आयुष विठ्ठल सूर्यवंशी हा लोखंडी टोचा, ओंकार उत्तम सूर्यवंशी हा कोयता, विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र महादेव सूर्यवंशी हे लाकडी दांडके घेऊन आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्यासह अन्य व्यक्तींनी एकत्र येऊन शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
दुसऱ्या गटातील फिर्यादीनुसार घराशेजारील बाथरूममधून घरात येणाऱ्या सूरज भरत सूर्यवंशी याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याचप्रमाणे, भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवरही कुराड, कोयता, दांडके, दगडांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत प्रज्वल किसन सूर्यवंशी, सौरभ भरत सूर्यवंशी, यश शशिकांत सूर्यवंशी, रेखा शशिकांत सूर्यवंशी, रोहिणी भरत सूर्यवंशी हे जखमी झाल्याची नोंद पोलिसात आहे.
या प्रकारात सूरज भरत सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूचेही दोघेजण जखमी झाल्याची माहिती असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या जखमींबाबतची सविस्तर माहिती घटनेतील त्यांची भूमिका पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, घटनास्थळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी मसूर पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली.या प्रकरणाचा पुढील तपास मसूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात करीत आहेत.
Bihar Minor Girl Harassment Video: बिहारच्या रस्त्यांवर मुली सुरक्षित का नाहीत? छेडछाडीच्या ‘त्या
शनिवारी रात्री याच कुटुंबातील व्यक्तींमध्ये रस्त्याच्या वादातून वाद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना बोलावून समज दिल्याची माहिती आहे. मात्र, रविवारी सकाळी पुन्हा वाद उफाळून आल्याने त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. अन् त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.दरम्यान दरम्यान इन कॅमेरा पोस्टमार्टम केल्यानंतर सुरजचा मृतदेह हेळगाव मध्ये आणण्यात आला. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.






