Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: काहीतरी भलतंच! जमीन पत्नीच्या नावावर, नातेवाईकांनी केलं जगणं मुश्किल; राग अनावर होत नवऱ्याने केला बायकोचा खून

कल्याणमध्ये पत्नीच्या नावावर जमीन खरेदी केल्यामुळे नातेवाईकांकडून होणाऱ्या टोमण्यांमुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. 10 जून रोजी झालेल्या भांडणात पती मुबीन खान याने पत्नी आयशाबानो यांना अमानुष मारहाण केली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 12:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीच्या नावावर जमीन घेतल्याच्या कारणावरून घरात सतत वाद होत होते.
  • संतापाच्या भरात पतीने पत्नीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
  • उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला; आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली.
कल्याण: कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या गावी पत्नीच्या नावावर जमीन खरेदी करणे एका पतीला आणि त्यांच्या कुटुंबियांना इतके खटकले की, त्यावरून पतीने आपल्या पत्नीला अमानुष मारहाण केली. ही मारहाण एवढी अमानुष होती की पत्नीचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्व येथे मुबीन खान आणि त्याचे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून राहत होते. या प्रकरणातील आरोपी पाटी मुबीन खान आणि मृत पत्नी आयशाबानो यांचे २००६ मध्ये झाले होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून एका कौटुंबिक कारणावरून पती-पत्नीमध्ये खटके उडत होते. हा वाद मुबीन खान ने घेतलेल्या जमीन मुळे होता. मध्यप्रदेशातील आपल्या गावी मुबीन खानने एक जमीन खरेदी केली होती. ही जागा त्याने आपल्या नावावर न घेता पत्नी आयशाबानो यांच्या नावावर खरेदी केली होती. ही गोष्ट मुबीनच्या नातेवाईकांना अजिबात आवडली नव्हती.

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण

नातेवाईकांचे टोमणे आणि…

नातेवाईक वारंवार मुबीनला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून, तू पत्नीच्या नावावर जागा का घेतली? असा सवाल विचारून चिथावणी देत होते. सतत टोमणे मारत होते. या सततच्या टोमण्यामुळे मुबीन चिडला होता आणि यामुळे आपल्या पत्नीशी तो भांडत होता. हा वाद १० जूनला अत्यंत विकोपाला गेला. मुबीन खान आणि आयशाबानो यांच्यात जोरदार भांडण सुरु झालं. या भांडणदरम्यान त्याचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्याने आयशाबानो यांच्या पोटात आणि शरीरावर लाथा-बुक्क्यांनी अत्यंत अमानुषपणे जबर मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत आयशाबानो गंभीर जखमी झाल्या आणि त्या घरातच कोसळल्या.

प्रकृती खालावली आणि…

आयशाबानोची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आणि त्यांना तातडीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर सतत उपचार करत होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आरोपी अटकेत

बहिणीच्या मृत्यूची माहिती मिळताच आयशाबानो यांच्या भावाने थेट पोलीस ठाणे गाठले. त्याने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती मुबीन खान याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला तात्काळ पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Sangli Crime: नशेत झाला वाद अन् संपला जीव! बापानेच केली मोठ्या मुलाची हत्या; मदतीला धावला धाकटा मुलगा

💡

Frequently Asked Questions

  • Que: या घटनेतील मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: आयशाबानो असे मृत महिलेचे नाव आहे.

  • Que: वादाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: मध्य प्रदेशातील जमीन पत्नीच्या नावावर खरेदी केल्यामुळे नातेवाईकांकडून होणारे टोमणे आणि त्यातून निर्माण झालेला वाद हे मुख्य कारण होते.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: आयशाबानो यांच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती मुबीन खान याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: Kalyan crime a bizarre turn of events land was in the wifes name and relatives made life miserable unable to control his rage the husband murdered his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
2

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.