crime (फोटो सौजन्य: social media)
डोंबिवली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या पिसोली गावात एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणिलाल एका परप्रांतीय गुंडाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या तरुणीचा नाव सोनाली कळासरे असे आहे. मारहाण करणाऱ्या परप्रांतीयच नाव गोकुळ झा असे आहे. मारहाण केल्यानंतर हा फरार झाला. या मारहाणीचा व्हिडीओ वायरल झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याव्यक्तीचा छडा लावण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. कल्याण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होते. तो अखेर
मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला आहे. नवाळी परिसरात त्याला ताब्यात घेण्यात आले.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; प्रियकराचं खरं रूप पुढे येताच केली आत्महत्या
लूक बदलून बाहेर पडला
मारहाण करणारा परप्रांतीय गोकुळ झा यांनी आपली ओळख लपवण्यासाठी त्याचा लूक बदलला होता. तो नांदिवली परिसरात फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो. त्यामुळे या भागात त्याला अनेकजण ओळखतात. त्याला कोणी ओळखू नये आणि पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी गोकुळ झा याने केस कापले होते. नेहमीसारखा पोशाख न करता टी-शर्ट परिधान केला होता. पोलिसांपासून त्याचप्रमाणे जागरूक नागरिकांपासून आपला चेहरा लपवण्यासाठी त्याने स्वतःचा लूक बदलण्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा त्याचा लूक आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरचा लुकमध्ये फरक असल्याचे दिसून आले आहे. गोकुळ झा याला लूक बदलण्यामुळे आपण पकडले जाणार नाही, परंतु तो पकडला गेला. तो मंगळवारी रात्री नेवाळी परिसरात फिरत होता. त्यावेळी मनसेच्या योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी कसे पकडले?
मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी डोंबिवलीतील आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा याला शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते दिवसभर त्याला शोधत होते. अखेरीस रात्री तो कल्याणमधील वसार गावातून शेतातून पळत जात असताना मनसैनिकांना दिसला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून गाडीत टाकले आणि पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलिस आज गोकुळ झा याला न्यायालयात सादर करणार आहे.
न्यायालयात गोंधळ
गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणी वेळी गोकुळ झा याने माझ्यावर चुकीची कारवाई म्हणत, माझ्या भावाला का ताब्यात घेतलं असे सांगत त्याने न्यायालयात गोंधळ घातला. यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. यावेळी पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.
Crime News : गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अंमली पदार्थ विक्रेता कासीम खान अखेर पोलिसांच्या ताब्यात