गर्भवतीची चिमुकलीसह विहिरीत उडी (फोटो सौजन्य-X)
तुमसर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची संख्याही जास्त आहे. असे असताना नागपूर येथे एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. जेव्हा आरोपी प्रियकराचे खरे रूप पुढे आले तेव्हा तिला धक्काच बसला. यामध्ये तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी नागपूर येथील अजनी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तुमसर येथे सोमवारी (दि.21) वर्ग होताच घटनेचे बिंग फुटले. सदर गुन्ह्यात तुमसर पोलिसांनी प्रियकर प्रिंस भजनलाल मेश्राम (वय 22) व त्याचे आई-वडील भजनलाल मेश्राम (वय 48), रागिनी भजनलाल मेश्राम (वय 40, तिघेही रा. आंबेडकर वॉर्ड, तुमसर) यांच्याविरुद्ध अत्याचार तथा आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या संघटित गुन्ह्यांतर्गत नोंद घेतली आहे. राधा (बदललेले नाव) घटनेच्या आठवडाभरापूर्वी आरोपी प्रियकराच्या घरी लग्नाच्या आश्वासनावर तुमसरात दाखल झाली होती. मात्र, आरोपींनी तिला सलग 2 दिवस घराबाहेर ठेवून राधाला त्रास दिल्याची माहिती फिर्यादी बहिणीने पोलिसांना दिली.
हेदेखील वाचा : Ahilyanagar : रक्षकच बनले भक्षक ! गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांनी घेतली कोट्यावधींची खंडणी
त्यातूनच राधाने 17 जुलै रोजी विषारी औषध पिऊन शहरातील गांधी सागर तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात ती थोडक्यात बचावली होती. प्रकृती नाजूक असल्याने तिला भंडारा येथून नागपूर हलविण्यात आले होते. घटनेच्या दिवशी नागपूरला उपचारादरम्यान ती दगावली. सदर आरोप करत फिर्यादी बहिणीने अजनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
आरोपींचा शोध सुरू
सोमवारी रात्री उशिरापर्यंत तुमसर पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी मेश्राम कुटुंबीय पसार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मुंडे यांनी दिली आहे. सध्या पोलिस आरोपींच्या मागावर असून महिला विरोधी सदर घटनेने शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
लग्नाचा फास टाकून अतिप्रसंग
आरोपी प्रियकराने राधा अल्पवयीन असल्यापासून तिच्याशी लग्नाचा फास टाकून 2023 पासून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर अतिप्रसंग केले. आपल्या बहिणीची फसवणूक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका फिर्यादीने प्रियकरासह त्याच्या आरोपी मातापित्यावर ठेवला आहे. त्यातूनच तुमसर पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रकरण तपासात घेतले आहे.