Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Family Assault: “अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!”परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ

Family Assault: अश्लील मेसेजचा जाब विचारल्याने थेट परप्रांतीय तरुणांनी मराठी पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर केला जीवघेणा हल्ला! कल्याणमधील या संतापजनक प्रकाराने उडाली खळबळ... नेमके काय घडले त्या रात्री? पाहा अंगावर काटा आणणारे सविस्तर वृत्त!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 16, 2026 | 03:04 PM
Family Assault: "अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!"परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ

Family Assault: "अश्लील मेसेजचा जाब विचारला म्हणून पोलिसाच्या कुटुंबावर हल्ला!"परप्रांतीय तरुणांच्या या मुजोरीमुळे उडाली खळबळ

Follow Us
Follow Us:
  • परप्रांतीय तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नी व मुलींना पाठवले अश्लील मेसेज
  • जाब विचारल्याच्या रागातून कुटुंबियांना मारहाण
  • पोलिसांनी सौम्य कलमे लावल्याचा आरोप करत मनसेने कठोर कारवाईची केली मागणी 
Family Assault: सणासुदीच्या दिवशीच कल्याण पूर्वेत एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. अश्लील मेसेज पाठवल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका परप्रांतीय तरुणाने मराठी पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा सर्व धक्कादायक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे कल्याणमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: Student Kidnapping: पिंपरी-चिंचवड हादरले! महाविद्यालयीन तरुणाचे दिवसाढवळ्या भररस्त्यात अपहरण अन् चौकात नेऊन…

काय आहे नेमके प्रकरण?

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मुंबई वाहतूक पोलीस दलात कार्यरत आहेत. गेल्या रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आरोपींनी पीडित पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला आणि अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवून त्यांच्याशी गैरवर्तन केले. हा प्रकार निदर्शनास येताच पीडित कुटुंबाने संबंधित परप्रांतीय कुटुंबाला याबाबत जाब विचारला. मात्र, आपली चूक मान्य करण्याऐवजी आरोपींनी उलट पीडित पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलींनाच बेदम मारहाण केली.

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, पण…

या प्रकरणी मंगळवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत जयस्वाल, नीरज जयस्वाल (वय २२), सुजित जैयस्वाल, प्रदीप वर्मा (वय २५) यांच्यासह आणखी एकाविरोधात ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मात्र, पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्याच कुटुंबावर हल्ला होऊनही कोळसेवाडी पोलिसांनी आरोपींवर केवळ सौम्य स्वरूपाची कलमे लावल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

हेही वाचा: Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…

मनसेचा आक्रमक पवित्रा

पोलिसांच्या या भूमिकेनंतर पीडित मराठी कुटुंबाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे (मनसे) धाव घेतली आहे. मनसेच्या नगरसेविका शीतल मंढारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सतीश उगले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कल्याणमधील कोणत्या भागात घडली?

    Ans: कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

  • Que: पीडित कुटुंबाचे प्रमुख कुठे कार्यरत आहेत?

    Ans: पीडित कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मुंबई वाहतूक पोलीस दलात कार्यरत आहेत.

  • Que: या प्रकरणी कोणत्या राजकीय पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे

    Ans: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Kalyan east kolsewadi police family assault case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • kalyan crime case
  • kalyan crime news
  • Maharashtra Police

संबंधित बातम्या

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…
1

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…
2

Father Murder Case: “जन्मदात्याच्या लेकानेच घेतला जीव!” घरगुती वादातून मुलानेच वडिलांचे डोके भिंतीवर आदळत आवळला गळा…

Nagpur: “प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याने संपवले!” नागपुरात सराईत गुंडाचा खूनी थरार; अल्पवयीन प्रेयसीच्या मामीचे अपहरण करून..
3

Nagpur: “प्रेमप्रकरणाचा जाब विचारल्याने संपवले!” नागपुरात सराईत गुंडाचा खूनी थरार; अल्पवयीन प्रेयसीच्या मामीचे अपहरण करून..

PSI Suicide: पोलीस दलात खळबळ! प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवा पोलीस उपनिरीक्षकाची धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या
4

PSI Suicide: पोलीस दलात खळबळ! प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवा पोलीस उपनिरीक्षकाची धावत्या ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.