सौजन्य फोटो - AI Gemini
हेही वाचा: Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…
मिळालेल्या माहितीनुसार, ताथवडे परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर फिर्यादी सुनील केशव होळकर (रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांचा मुलगा ओम उभा होता. त्याच वेळी आरोपी रामेश्वर साहेबराव तोगरे (रा. समर्थ कॉलनी, वाकड) आणि त्याचा एक अज्ञात साथीदार तिथे आले. त्यांनी ओम याला कोणतीही संधी न देता जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले आणि तिथून पळवून नेले. आरोपींनी त्याला थेट डांगे चौकाकडे नेले आणि तिथे त्याला बेदम मारहाण केली.
या प्रकारानंतर तरुणाच्या संतप्त आणि घाबरलेल्या वडिलांनी, म्हणजेच सुनील होळकर यांनी तातडीने वाकड पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची फिर्याद दिली. फिर्यादीनुसार वाकड पोलिसांनी रामेश्वर तोगरे आणि त्याच्या एका अज्ञात साथीदाराविरुद्ध अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या अपहरण आणि मारहाणीच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Ans: पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली.
Ans: फिर्यादी सुनील होळकर यांचा मुलगा ओम असे या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.
Ans: वाकड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






