Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard Attack Farmer: गोधडी ठरली ‘सुरक्षा कवच’! गळ्याचा वेध घेणारा बिबट्या कसा पडला मागे?

Leopard Attack Farmer: औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात मध्यरात्री साक्षात काळ बनून बिबट्या समोर आला! झोपडीत एकटेच झोपलेल्या ६५ वर्षीय गणपत जाधव यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र, जाधव यांनी आपल्या हिमतीने बिबट्याशी झुंज दिली. गोधडीने कसा वाचवला त्यांचा जीव? कसा केला त्यांनी प्रतिकार? वाचा हा थरारक अनुभव.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 29, 2026 | 12:18 PM
Leopard Attack Farmer: गोधडी ठरली 'सुरक्षा कवच'! गळ्याचा वेध घेणारा बिबट्या कसा पडला मागे?

Leopard Attack Farmer: गोधडी ठरली 'सुरक्षा कवच'! गळ्याचा वेध घेणारा बिबट्या कसा पडला मागे?

Follow Us
Follow Us:
  • शेतात झोपलेल्या ६५ वर्षीय गणपत जाधवांवर बिबट्या धावून आला
  • गोधडीने मान वाचवली; तोंडात काठी घालताच बिबट्या पळाला
  • गंभीर जखमी जाधवांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Leopard Attack Farmer: मध्यरात्रीची वेळ… शेतातील झोपडीत एकटेच झोपलेले ६५ वर्षीय वृद्ध… आणि अचानक समोर साक्षात मृत्यू बनून आलेला बिबट्या! कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील उपळा शिवारात बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा थरार घडला. गणपत जाधव या ६५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या हिमतीच्या जोरावर बिबट्याला पळवून लावले, परंतु त्यांच्या गोधडीने त्यांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नेमकी कशी घडली घटना?

गणपत जाधव यांचे कन्नड-चाळीसगाव महामार्गालगत शेत असून तिथेच त्यांची झोपडी आहे. कुटुंबातील इतर सदस्य ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेल्याने जाधव घरी एकटेच होते. बुधवारी रात्री जेवण करून ते घरासमोरील बाजेवर झोपले होते. थंडी असल्यामुळे त्यांनी अंगभर गोधडी पांघरली होती, मात्र त्यांचा उजवा हात गोधडीबाहेर होता. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एका बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. गोधडीबाहेर असलेल्या त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला बिबट्याने जोरात चावा घेतला.

हेही वाचा: Amravati Accident News: क्षणार्धात घात झाला! अप्पर वर्धा कालव्यात पाय घसरला अन् ५२ वर्षीय शेतकरी पाण्याच्या तीव्र प्रवाहात गायब

गोधडीने वाचवला जीव; काठीने केला प्रतिकार!

हल्ला होताच जाधव यांना जाग आली. मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी सांगितले की, जाधव यांनी अंगभर गोधडी गुंडाळली होती, त्यामुळे बिबट्याला त्यांच्या अत्यंत संवेदनशील अशा गळ्याला पकडता आले नाही. अशा प्रकारे गोधडी जाधव यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ‘सुरक्षा कवच’ ठरली. हल्ला झाला तरी जाधव यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रसंगावधान राखत जवळच असलेली काठी बिबट्याच्या थेट तोंडात घातली आणि जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. जाधव यांचा हा रौद्र अवतार आणि तोंडात घुसलेली काठी पाहून बिबट्या घाबरला आणि त्याने तेथून पळ काढला. त्यांच्या आवाजाने ग्रामस्थ जागे झाले आणि त्यांनी तातडीने जाधव यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

महिनाभर वैद्यकीय निगराणीखाली

बिबट्याच्या या हल्ल्यात जाधव यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बिबट्याचे दोन दात घुसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. तसेच खांद्याखालील दंडावर बिबट्याच्या तीक्ष्ण पंजामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना अँटी-रेबीज आणि अँटिबायोटिक इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. पुढील महिनाभर त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा: Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे… तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी

वन विभागाच्या कारभारावर लोकप्रतिनिधींचा संताप

या घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी वन विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत, डॉ. संजय गव्हाणे आणि राहुल राठोड यांनी वन विभागाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेबाबत विचारणा केली असता सहायक वनसंरक्षक विशाल कवडे यांनी त्यांना याची माहिती नसल्याचे सांगत ते वैजापूर येथे असल्याचे स्पष्ट केले. वनपाल प्रवीण पारधी यांनी सांगितले की, ते छत्रपती संभाजीनगर येथे होते. घटनेचा पंचनामा करण्यासाठी लवकरच घटनास्थळी जाणार असून, तेथे वनरक्षक यशदा साळवे उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील उपळा शिवारात, बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.

  • Que: गणपत जाधव यांचा जीव बिबट्याच्या हल्ल्यातून कसा वाचला?

    Ans: जाधव यांनी थंडीमुळे अंगभर गोधडी पांघरली होती, ज्यामुळे बिबट्याला त्यांच्या गळ्याला पकडता आले नाही. त्यांनी बिबट्याच्या तोंडात काठी घातल्यामुळेही त्यांचा जीव वाचला.

  • Que: बिबट्याच्या हल्ल्यात गणपत जाधव यांना किती दुखापत झाली आहे?

    Ans: जाधव यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बिबट्याचे दोन दात लागले आहेत आणि खांद्याखालील दंडावर पंजाने गंभीर जखम केली आहे. त्यांना महिनाभर वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

Web Title: Kannad aurangabad 65 year old farmer defends leopard attack with stick and godhadi sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Animal Attack
  • farmer
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

Amravati Accident News: क्षणार्धात घात झाला! अप्पर वर्धा कालव्यात पाय घसरला अन् ५२ वर्षीय शेतकरी पाण्याच्या तीव्र प्रवाहात गायब
1

Amravati Accident News: क्षणार्धात घात झाला! अप्पर वर्धा कालव्यात पाय घसरला अन् ५२ वर्षीय शेतकरी पाण्याच्या तीव्र प्रवाहात गायब

Jalgaon News : वीजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू, नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
2

Jalgaon News : वीजेच्या धक्क्याने शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू, नातेवाईकांसह कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश
3

Amravati News: चारा उत्पादनासाठी अनुदान! ४ हजार रुपयांपर्यंत चारा बियाण्यांसाठी तरतूद; बच्चू कडू यांच्या मागणीला यश

Raver: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल
4

Raver: कापसाला १० हजार रुपये द्या म्हणणारे महाजन गप्प का? दानवेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.