सौजन्य फोटो - AI Gemini
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेसच्या (IX-291) विमानाने आलेल्या एका प्रवाशावर नजर ठेवली होती. विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे अधिकाऱ्यांनी त्याला रोखून त्याच्या सामानाची कसून तपासणी केली. मात्र, सुरुवातीला त्याच्या सामानात काहीही संशयास्पद आढळले नाही.
सामानात काहीही न मिळाल्याने प्रवाशाला सोडण्यात येणार इतक्यात अधिकाऱ्यांचे लक्ष त्याने घातलेल्या काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स शूजकडे गेले. या शूजची जाडी आणि अवाजवी वजन पाहून अधिकाऱ्यांना तीव्र संशय आला. अधिकाऱ्यांनी बुटांची बारकाईने पाहणी करत थेट शूजचे सोल कापले. सोल कापताच आतमध्ये अंमली पदार्थ लपवण्यासाठी अत्यंत चाणाक्षपणे तयार केलेले खास कप्पे आढळले, ज्यात हशिशचे पॅकेट्स दडवण्यात आले होते.
या धडक कारवाईत सीमाशुल्क विभागाने तब्बल ३८९.२७ ग्रॅम हशिश (Hashish) जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत सुमारे १३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. सीमाशुल्क विभागाने तात्काळ या प्रवाशाला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS Act) अटक केली. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीत आणखी कोणाचा हात आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
Ans: बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या काळ्या स्पोर्ट्स शूजचे वजन आणि जाडी संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी शूजचे सोल कापून त्यातील हशिश जप्त केले.
Ans: कारवाईत ३८९.२७ ग्रॅम हशिश जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे १३ लाख ५० हजार रुपये आहे.
Ans: सीमाशुल्क विभागाने आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.






