Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Crime: चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर…

UP Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये चुलत भाऊ-बहिणीने प्रेमविवाह केल्यानंतर घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप असून, त्यानंतर तिच्या भांगेत सिंदूर भरून स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 29, 2026 | 05:09 PM
चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर..

चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर..

Follow Us
Follow Us:
  • चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट
  • पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला
  • नंतर पती पण गळफासावर…
UP Crime News In Marathi: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बर्रा परिसरात प्रेमविवाह केलेल्या एका तरुण दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना काय?

ही घटना बर्रा-7 येथील एसएस ब्लॉकमधील भाड्याच्या घरात घडली. काही दिवसांपूर्वीच हे दाम्पत्य येथे राहण्यासाठी आले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पतीने पत्नीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

kolhapur Crime: पंढरपूर दर्शनाच्या बहाण्याने गोठ्यात नेलं, माजी सरपंचेची गळा आवळून हत्या; मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट, मात्र..

पत्नीच्या भांगेत सिंदूर, खोलीत विखुरलेले चिन्ह

फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, खोलीच्या जमिनीवर सिंदूर विखुरलेला आढळला. तसेच सिंदूराची डबीही जवळ पडलेली होती. मृत महिलेच्या भांगेत सिंदूर भरलेला होता, तर तरुणाच्या हात-पायांवरही सिंदूराचे डाग आढळले. यावरून पत्नीची हत्या केल्यानंतर तिच्या भांगेत सिंदूर भरून पतीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन वर्षांच्या प्रेमसंबंधाचा शोकांत शेवट

मृतांची ओळख 22 वर्षीय सौरभ सविता उर्फ टोनी आणि 18 वर्षीय राणी उर्फ शालिनी अशी झाली आहे. दोघेही नात्याने चुलत भाऊ-बहिण असल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा विरोध असतानाही त्यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी घर सोडून कोर्ट मॅरेज केले होते.

लग्नानंतर दोघे काही काळ दिल्लीत राहत होते. त्यानंतर सुमारे पाच दिवसांपूर्वी ते कानपूरला परतले आणि बर्रा-7 परिसरातील एका होजरी व्यावसायिकाच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर भाड्याने राहू लागले होते.

रोशनदानातून उघडकीस आली घटना

मंगळवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने छतावर कपडे वाळत घालण्यासाठी जात असताना रोशनदानातून खोलीत डोकावले. त्यावेळी तिला पंख्याला लटकलेला तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने घरमालकाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.

घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक पथकाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत प्लास्टिकच्या चटईवर महिलेचा मृतदेह पडलेला होता, तर तरुणाचा मृतदेह साडीच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

कुटुंबीयांचा गंभीर आरोप

मृत राणीची आई पिंकी यांनी सांगितले की, घटनेच्या काही वेळापूर्वीच त्यांची मुलगी आणि जावयाशी फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी कोणत्याही वादाची कल्पना आली नव्हती. मात्र, कोर्ट मॅरेजनंतरही सौरभच्या कुटुंबीयांनी राणीला स्वीकारले नव्हते आणि दोघांवर वेगळे होण्यासाठी दबाव टाकला जात होता, असा आरोप त्यांनी केला आहे.

पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा

दक्षिण विभागाचे डीसीपी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र, सर्व बाजूंनी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबांनंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

भाडेकरू पडताळणीवरही प्रश्न

या प्रकरणात घरमालकाला भाडेकरूंबाबत फारशी माहिती नसल्याचेही तपासात समोर आले आहे. मोटारसायकलच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी सौरभच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. या घटनेनंतर पुन्हा एकदा भाडेकरूंच्या पोलिस पडताळणीच्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटणार? कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड; सुरज ठोंबरे टोळीची उडी

Web Title: Kanpur cousin couple tragic murder suicide court marriage case news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.