
crime (फोटो सौजन्य: social media)
धक्कादायक ! ‘त्या’ हत्येचा झाला उलगडा; फक्त पैशांच्या वादातून चिरला वैष्णवीचा गळा
काय नेमकं प्रकरण?
महिलेच्या पतीचे निधन झाले असून ती ४ वर्षांपासून गोरेलाल नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंधात होती. महिलेचा प्रियकर सतत तिच्या घरी येत-जात असायचा. तो तिच्या घरी रात्री सुद्धा थांबायचं. त्या महिलेच्या मुलांना सुद्धा गोरेलाल आपल्या वडिलांची कमतरता पूर्ण करेल, असे वाटत होते. मात्र आरोपी प्रियकराच्या मनात वेगळंच होते. महिलेच्या १३ वर्षांच्या मुलीवर त्याची आरोपीची वाईट नजर होती. त्यामुळे, तो सतत त्याच्या विधवा प्रेयसीवर मुलीसोबत संबंध ठेवण्यासाठी सतत दबाव आणत होता. इतकेच नाही तर मुलीसोबत संबंध ठेवून न दिल्यास तिच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी सुद्धा त्याने दिली. यावरून महिलेने आपल्या भाच्यासोबत मिळून हत्येचं कट रचलं.
कशी केली हत्या?
महिलेने तिच्या प्रियकराला लग्नाचा आमिष दाखवून माहेरी घेऊन गेली. तिथे तिने त्याला भरपूर दारू पाजली आणि गोरेलाल नशेत बेशुद्ध झाला. त्यावेळी, महिलेने त्याच्या भाच्यासोबत मिळून गोरेलालची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर, यिशुने त्याच्या मित्राला बोलावले आणि तिघांनी मिळून गोरेलालचा मृतदेह ३००मी. जंगलात खड्डा खोदून त्यात पुरला.
त्याने माझ्यासोबत जे काही केलं ते मी सहन केलं…
२ नोव्हेंबर रोजी गोरेलालच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासादरम्यान, गोरेलालचे आरोपी महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यांनतर, सपनाची चौकशी करण्यात आली आणि कठोर चौकशीदरम्यान तिने तिचा गुन्हा कबूल केला. आरोपी महिला म्हणाली की, “त्याने माझ्यासोबत जे काही केलं ते मी सहन केलं, पण त्याची माझ्या मुलीवर वाईट नजर असलेली मी सहन करू शकले नाही.” या प्रकरणात पोलिसांनी सपना आणि तिच्या भाच्याला अटक केली आहे. तसेच मृतदेह लपवण्यासाठी मदत करणाऱ्या मित्राचा शोध घेण्यास सुद्धा सुरु आहे.
Accident News: मुंबई आमदाबाद महामार्गावरील सातीवली उडान पुलावर भीषण अपघात; १४ प्रवासी जखमी
Ans: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील चौबेपूर परिसरात.
Ans: आरोपी प्रियकराची 13 वर्षांच्या मुलीवर वाईट नजर आणि लैंगिक दबाव.
Ans: आरोपी महिला व तिच्या भाच्याला अटक; मृतदेह लपवणाऱ्या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू.