Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: घरात एकटी असताना 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या; एकही साक्षीदार नाही, तरी 4 तासांत आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे 18 वर्षीय वैष्णवी नीळ हिची घरात गळा चिरून निर्घृण हत्या झाली. एकही साक्षीदार नसतानाही वाळूज पोलिसांनी अवघ्या 4 तासांत आरोपी नानासाहेब मोरेला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 21, 2025 | 09:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरात एकटी असताना 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या
  • कोणताही ठोस पुरावा नसतानाही 4 तासांत आरोपी जेरबंद
  • मैत्रीतील वादातूनच हत्या केल्याची आरोपीची कबुली
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली होती. एका १८ वर्षीय तरुणीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले होते. ही धक्कदायक घटना शुक्रवारी मुरमी येथे घडली. मृत तरुणीचे नाव वैष्णवी संतोष नीळ असे आहे. या घटनेचा एकही साक्षिदार किंवा ठोस पुरावा नव्हता म्हणून आरोपीला शोधण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर होत. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासात वाळूज पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी कोण आहे, त्याने हत्या का केली? आरोपीला कशी अटक करण्यात आली? नेमकं प्रकरण काय?

Navi Mumbai Crime: वाद, संताप आणि थेट रुळांवर…,धावत्या लोकलमधून 18 वर्षीय तरुणीला ढकललं; नवी मुंबई येथील घटना

नेमकं काय घडलं?

वैष्णवी ही वाळूजच्या एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत होती. कॉलेज संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता ती घरी आली. यादरम्यान तिची आई शेतावर गेली तर तिचे वडील पानटपरीवर गेले होते. तर तिचा भाऊ शाळेत गेला होता. वैष्णवी ही घरात एकटीच होती. हीच संधी साधत त्यांच्याच गल्लीत राहत असलेला आरोपी नानासाहेब कडूबा मोरे(वय २७, रा. मुरमी)हा तिच्या घरी आला. त्याने साडेतीन वाजेच्या सुमारास धारदार शास्त्राने वैष्णवीची गळा चिरून हत्या केली. यानंतर तो पसार झाला.

वडील घरी आले तेव्हा वैष्णवी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात दिसली. त्यांनी तिच्या आईला फोन केला आणि सांगितले की वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत आहे. तिची आई घरात आली आणि नातेवाईक घरी आले. तेव्हा वैष्णवीला रक्ताच्या थारोळ्यात बघून आईचे भान हरपले. तिला तत्काळ बाहेर ओसरीत आणले असता तिचा मृत्यू झाला होता. तुरंत पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पंचांनामा केला असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दुसरीकडे पोलिसांनी पथक तयार करून आरोपीच्या तपासाची सुरुवात केली.

वादामुळे केली हत्या

पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला जेरबंद केले. शनिवारी पहाटे पोलिसांनी आरोपी नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) याच शोध घेऊन अटक केले. एकाच गल्लीत राहणाऱ्या नानासाहेबासोबत तिचे मैत्रिपूर्णसंबंध होते. मात्र त्यांच्यात वाद झाला आणि हाच वाद विकृतीला नानासाहेबने शुक्रवारी निर्घुपणे वैष्णवीची हत्या केली.

हत्येनंतर तो रात्री नेमका शेजारचा नानासाहेब घरी नसल्याचे पोलिसांना समजले व त्याचा शोध सुरू केला. गंगापूरमधील बोलेगाव येथे लपून बसलेला असताना पहाटे ३.३० ला पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी नानासाहेबने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. त्याला न्यायालयासमोर हजर केले तेव्हा २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Dhule News: सेल्फी, ‘गुड बाय’आणि स्टेटस ठेवून तापी नदीत उडी; सुरतहून यात्रेसाठी गावी आलेल्या 22 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे, शुक्रवारी दुपारी.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: नानासाहेब कडूबा मोरे (वय 27, रा. मुरमी).

  • Que: पोलिसांनी आरोपीला कशी अटक केली?

    Ans: आरोपी बोलेगाव येथे लपून बसलेला असताना पहाटे 3.30 वाजता अटक करण्यात आली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar an 18 year old girl was brutally murdered while alone at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया
2

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.