
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबरला अलवरच्या प्रतापगढ येथील एका गावात चौथीत शिकणाऱ्या मुलीचा मृतदेह झाडांमध्ये सापडला. पोलिसांनी तपास केला तेव्हा ही हत्या मुलीच्या बापानेच केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. गुरुवारी सकाळी मुलगी बकरी चारण्यासाठी घरातून निघाली होती. त्यावेळी आरोपी पिता तिच्या मागे गेला आणि घरापासून साधारण ४०० मीटर दूर तिचा गळा दाबून हत्या केली. गळा दाबताना मुलीच्या मानेचं हाड तुटलं आणि तिची मृत्यु झाली. त्याने आपला गुन्हा कबुल केला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
का केली हत्या?
साधारण सात दिवसांपूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. आरोपी पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. सात दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या पत्नीला मारहाण केली होती. आरोपी पती नशादेखील करीत होता. पती पत्नीला घेण्यासाठी तिच्या माहेरीही गेला होता. मात्र माहेरच्यांनी मुलीला पाठवलं नाही. आरोपीने पत्नीला बोलावण्यासाठी अनेर प्रयत्न केले. मात्र तरीही ती परतली नाही. यानंतर आरोपीने मुलीच्या हत्येचा प्लान आखला. लेकीच्या हत्येमध्ये दु:खी झालेली पत्नी आपल्याकडे येईल असा विचार करून त्याने मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली.
Ans: राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी ही घटना घडली.
Ans: पत्नी परत यावी आणि भावनिक दबाव येईल, या विकृत विचारातून त्याने लेकीचा खून केला.
Ans: तपासादरम्यान संशय बळावल्याने चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला अटक करण्यात आली.