Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद

कारेगावात पाण्याचा प्लँट सुरू करण्यासाठी आलेल्या ३९ वर्षीय कामगाराची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी डोक्यात गोळी झाडून हत्या केली. घटनास्थळी काडतूस सापडल्यानंतर अपघाती मृत्यूचे गूढ उकलले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 30, 2026 | 08:51 AM
Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद

Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद

Follow Us
Follow Us:
  • प्लँट सुरू करताना कामगाराच्या डोक्यात गोळी
  • काडतूस सापडल्याने अपघाती मृत्यूचा संशय दूर
  • सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद; पोलिसांचा तपास सुरू
 

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कारेगाव परिसरात मंगळवारी पहाटे ३९ वर्षीय कामगाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली. हामजा उस्मान शेख (वय ३९, मूळ रा. परभणी, सध्या रा. कारेगाव) हे साईनगर परिसरातील ‘समू एंटरप्रायजेस ॲक्वा रिच’ या पाण्याच्या प्रकल्पावर काम करत होते. पहाटे सव्वासहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे प्लँट सुरू करण्यासाठी आले असताना दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. मागे बसलेल्या व्यक्तीने दुचाकीवरून उतरून प्लँटच्या दारात जात हामजा यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी झाडली. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गोळीबाराचा आवाज परिसरातील नागरिकांना फटाक्यासारखा ऐकू आला.

हेही वाचा: केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती

काडतूस सापडले अन् अपघाती मृत्यूचा संशय दूर

गोळीबारानंतर शेजारील एका महिलेने हामजा यांच्या पत्नीला ते रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला हामजा घसरून पडल्याने डोक्याला दुखापत झाली असावी, असा अंदाज व्यक्त झाल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना बंदुकीच्या गोळीचे रिकामे काडतूस आढळले. त्यामुळे संशय बळावला. त्यानंतर मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता डोक्याला गोळी लागल्याचे स्पष्ट झाले आणि हा अपघात नसून हत्या असल्याचे समोर आले.

हेही वाचा:Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद; हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी तपासाची दिशा बदलत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी हामजा यांच्यावर गोळीबार केल्याचे दिसून आले. या प्रकरणी मृताची पत्नी अबिदाबी यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हामजा यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Web Title: Karegaon shirur 39 year old worker shot dead water plant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • maharashtra crime cases
  • Murder Case
  • pune murder news

संबंधित बातम्या

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत
2

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न
3

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…
4

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.