
नेरळ पोलिसांना बनावट विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार सदरच्या गुन्हयाचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल,अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, आणि उप अधीक्षक राहुल गायकवाड मार्गदर्शन घेऊन नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी मुरबाड कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर सापळा रचला.
गुप्तचर यांच्या माहिती नुसार 21 मार्च रोजी नेरळ पोलीस ठाणे कडील अधिकारी आणि अंमलदार यांचे संयुक्त तपास पथक यांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत जी जे 12, ए डब्लू 4421 ही ट्रॅक गाडी वारे येथील कोकण किनारा हॉटेल येथे संशयास्पद ट्रॅक ताब्यात घेतला. ट्रॅक चालक लादुराम खियाराम बिष्णोई हा गोवा बनावटीची दारूची विनापरवाना वाहतुक करत होता. वारे गावचे हद्दित कोकण किनारा हॉटेलच्या समोर कर्जत-मुरबाड रोडवर आढळून आला. हा सापळा रचला त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक वरोटे,पोलिस उप निरीक्षक सुनील शेंबडे,किसवे,पोलिस हवालदार पिंगळे,गुजराती,लावरे,खंडागळे, वाघमारे, गर्जे, राजाभाऊ केकान, आशू बेंद्रे, पिसाट,वांगणेकर, कनके, डाखोरे,काळे,यांच्या पथकाने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकला अडवले आणि हा संशयास्पद ट्रॅक ताब्यात घेण्यात आला.
नेरळ पोलिसांच्या या धडक कारवाईची माहिती जिल्हा उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या कारवाईत पोलिसांनी 29 लाख किमतीचा टँकर ताब्यात घेण्यात आला असून त्या टँकरमध्ये 41 लाख 28 हजाराची एव्हरग्रीन व्हिस्की,15 लाखाचा मोबी ऑरेंज व्हिस्की आणि 16 लाखाचा वोडका असा साधारण एक कोटी एक लाख 27 हजाराचा माल जप्त केला. नेरळ पोलिसांच्या या कारवाई कौतुक जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी केले आहे.