Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Crime: धक्कादायक! आत्महत्येचा बनाव करत तरुणीची हत्या; मृतदेहावर लैंगिक अत्याचार आणि…

केरळच्या कोझिकोडमध्ये आत्महत्या म्हणून नोंदवलेलं तरुणीचं प्रकरण तपासात हत्या असल्याचं उघड झालं. नातेवाईक आरोपीने आत्महत्येचा बनाव रचून तिची हत्या केली व मृतदेहावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 11:19 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आत्महत्या भासवलेलं प्रकरण तपासात पूर्वनियोजित हत्या ठरलं
  • नातेवाईक आरोपी अटकेत; गुन्ह्याची कबुली
  • फॉरेन्सिक व डिजिटल पुराव्यांमुळे कट उघडकीस
केरळ: केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील एका तरुणीच्या मृत्यूने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आहे. सुरुवातीला आत्महत्या म्हणून नोंद झालेलं हे प्रकरण तपासात पुढे जाताच धक्कादायक वळणावर पोहोचलं असून, ही घटना पूर्वनियोजित हत्या असल्याचं पोलिस तपासातून उघड झालं आहे. आत्महत्येचा बनाव रचत तरुणीची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेहावर लैंगिक अत्याचार केल्याचा भयंकर खुलासा समोर आला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या

काय घडलं नेमकं?

36 वर्षीय आरोपी वैशाख हा मृत महिलेचा जवळचा नातेवाईक होता. पीडित मृतक तरुणी ही २६ वर्षाची आहे. एलाथूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील औद्योगिक युनिटमध्ये पीडित गंभीर अवस्थेत आढळली. त्या महिलेला शनिवारी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती गंभीर होती आणि काही वेळानंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी विचारपूस केला असता पीडिता फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा आरोपीने सुरवातीला केला.

महिलेला फाशीवर लटकलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्याच्या पत्नीच्या मदतीने तिला रुग्णालयात नेलं असे त्यांनी सांगितलं. त्याने ते आत्महत्या असल्याचे भासवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण पोलिसांना त्याच्या जबाबात विरोधाभास जाणवू लागले आणि तपासात धक्कदायक गोष्टी उलगडत गेल्या.

तपासात काय समोर आलं?

तपासात असं दिसून आली की पीडितेचे आरोपीसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, आरोपीला आता तिच्यापासून सुटका हवी होती. त्यामुळे, त्याने सुसाईड पॅक्टचं आमिष दाखवून मुलीला युनिटमध्ये नेले. त्याने तिला आश्वासन दिलं की जर ते एकत्र राहू शकत नसतील तर ते एकत्र आत्महत्या करतील. आरोपीने आधीच दोन फास तयार केले होते जेणेकरून पीडितेला संशय येणार नाही.

त्यांनतर महिलेने फासात डोकं ठेवताच. आरोपीने तिच्या पायाखाली खर्ची लाथ मारून बाजूला केली. महिलेला सावरण्याची संधीच मिळाली नाही. खरं तर, ही पूर्णपणे पूर्वनियोजित हत्या होती. आरोपी तिथेच उभा होता आणि त्याच्या डोळ्यासमोर पीडिता वेदनेने तडफडत असल्याचं पाहत होता. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. फॉरेन्सिक रिपोर्ट्सनुसार, त्या पीडितेचा मृतदेह खाली उतरवल्यानंतरही तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या खुलाशामुळे प्रकरण आणखी भयानक झालं.

आरोपीची पुढची योजना रात्री परत येऊन युनिटची सीसीटीव्ही हार्ड डिस्क नष्ट करण्याची होती. तो पुरावे मिटवून कायमचा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पण पोलिसांना त्याच्या जबाबात काहीतरी संशयास्पद आढळलं. नंतर, पोलिसांनी युनिट सील केलं आणि डिजिटल पुरावे सुरक्षित केले.

कारण काय?

सखोल चौकशीत, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने कबूल केलं की त्याचे पीडितेसोबत अनैतिक संबंध होते आणि ती महिला त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती. त्यामुळे, त्याने तिच्या हत्येचा कट रचला. ही संपूर्ण घटना २४ जानेवारी रोजी घडली आणि मंगळवारी पोलिसांना आरोपीला अटक केली.

Delhi Crime: दिल्ली हादरली! सहा वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार; तीन अल्पवयीन आरोपी ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात 24 जानेवारी रोजी.

  • Que: सुरुवातीला प्रकरण आत्महत्या का मानलं गेलं?

    Ans: आरोपीने फाशी लावल्याचा बनाव करत दिशाभूल केली होती.

  • Que: पोलिस तपासात काय निष्पन्न झालं?

    Ans: ही पूर्वनियोजित हत्या असून, मृत्यूनंतर अत्याचार आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचं उघड झालं.

Web Title: Kerala crime shocking a young woman was murdered under the guise of a suicide the body was sexually assaulted and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.