Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडासंदर्भात इंस्टाग्राम स्टोरीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी एका महिला डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळल्यानंतर ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशनने संबंधित महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2026 | 01:58 PM
सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे महिला डॉक्टर अडचणीत आल्या आहेत.
  • डॉक्टरांच्या संघटनेने कठोर शिस्तभंगाची कारवाई करत मोठा निर्णय घेतला आहे.
  • नेमकी पोस्ट काय होती आणि संघटनेने इतकी कठोर कारवाई का केली, जाणून घ्या.
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या देशभरात चर्चित असून सोशल मिडियावरही याची जोरदार चर्चा रंगत आहेत. अनेकजण या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतानाच महिला डाॅक्टरला यात टिप्पणी करणं महागात पडल्याचं समोर आलं आहे. माहितीनुसार, डॉक्टरांची एक प्रमुख संघटना ‘ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन’ने कठोर कारवाई करत मध्य प्रदेश संघाच्या खजिनदार डॉ. मुस्कान सोनी यांना तत्काळ आपल्या पदावरुन हटवलं आहे. यासोबतच संघाने पुढील पाच वर्षांसाठीचे त्यांचे सदस्यत्व देखील निलंबित केलं आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, डाॅक्टर मुस्कान यांची टिप्पणी संस्थेचे नियम आणि प्रतिष्ठेच्या विरोधात आहेत.

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप

इंस्टाग्राम स्टोरीवरुन वाद

हा संपूर्ण विवाद इंस्टाग्राम स्टोरीवरुन सुरु झाला. डॉ.मुस्कान सोनी यांनी आपल्या इंस्टाग्राच्या अधिकृत अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली होती. त्यांची ही स्टोरी पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाशी जोडलेली होती. डॉ. मुस्कान यांनी कथितरित्या या स्टोरीत प्रकरणाची मुख्य आरोपी सिया गोयलचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नाही तर मृत व्यावसायित केतन अग्रवाल याच्या टक्कलपणाची आणि शारीरिक रूपाचीही यात खिल्ली उडवण्यात आली होती.

डॉ. मुस्कानने आपल्या या इंस्टाग्राम स्टोरीत लिहिले होते की, “तुम्ही असे खोटे बोलल्यास, तुमचा मृत्यू निश्चित आहे.” यासोबतच तिने यात #IHateMen असेही लिहिले होते. मुस्कानची स्टोरी व्हायरल होताच लोकांनी महिला डाॅक्टरवर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. इतकी असंवेदनशील आणि बेजबाबदार टिप्पणी केल्याबद्दल लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि डाॅक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली.

Ahilyanagar Crime: आलिशान कार, पांढरी पोती अन् 28 लाखांचा गुटखा; नगरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई

माफीनामा फेटाळला

प्रकरण फार चिघळत असल्याने डॉ. मुस्कान सोनी यांनी सोशल मिडियारॉवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला. या नव्या व्हिडिओत त्यांनी पूर्वीच्या वक्तव्याबद्दल आणि आपल्या टिप्पणींबद्दल जाहीरपणे माफी मागितली. त्यांनी सांगितले की, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू त्यांचा नव्हता. तथापि, ऑल इंडिया डेंटल स्टूडेंट्स एंड सर्जन्स असोसिएशनच्या (AIDSA) शिस्तपालन समितीने त्यांची ही माफी स्वाकारली नाही. संस्थेने आपल्या अधिकृत आदेशात म्हटले की, डॉ. मुस्कान यांचे शब्द आक्षेपार्ह, अपमानजनक आणि निंदनीय होते. समाजात संवेदनशीलता बनवून ठेवणे हे डाॅक्टरांचे काम असते, परंतु त्यांच्या पोस्टने समाजाला चुकीचा आणि द्वेषपूर्ण संदेश दिला. संस्थेने कठोर निर्णय घेत त्यांना पुढील ५ वर्षांसाठी निलंबित केले आहे, जेणेकरुन भविष्यात असे पुन्हा कोणी करु नये.

 

Web Title: Ketan agarwal murder case woman doctor suspended for 5 years over instagram story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • crime news
  • Ketan Agarwal
  • trending

संबंधित बातम्या

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
1

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
2

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
3

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
4

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.