Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Case: लोहगड हत्याकांडात मोठा ट्विस्ट; ‘गाडीत बसायलाही तयार नव्हती सिया’, ड्रायव्हरने सांगितला बाली ट्रिपचा घटनाक्रम

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाण्याआधी सिया गोयलच्या हालचालींबाबत वाहन चालकाने माहिती दिली आहे. पासपोर्ट आणि गाडीतील घटनाक्रमामुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे. दरम्यान सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपत असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2026 | 09:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बाली ट्रिपच्या प्रवासातील सियाच्या हालचाली वाहन चालकाने पोलिसांना सांगितल्या.
  • लोहगडावर पोलिसांनी डमीच्या मदतीने क्राईम सीन रिक्रिएशन केले.
  • सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपल्याने आज न्यायालयात हजेरी होणार.
पुणे: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारा केतन अग्रवाल प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहे. सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे प्री वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते, त्यासाठी सिया गोयलला पुण्यातून विमानतळापर्यंत सोडणाऱ्या वाहनाचा चालकाने बाली ट्रिपचा घटनाक्रम सांगितलं आहे.

काय सांगितलं वाहन चालकाने?

सिया आणि केतन अग्रवाल हे प्री – वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. त्यासाठी त्यांनी पुण्यातून एक गाडी बुक केली होती. बालीला जाण्यासाठी सिया तयार नव्हती ती गाडीत सुद्धा बसायला तयार नव्हती म्हणून सियाचा भाऊ साहिलने तिला हाताला धरून जबरदस्ती गाडीत बसवले. यावर सिया आणि तिचा भाऊ साहिल यांची पुणे ते रावेत (पिंपरी चिंचवड) दरम्यान गाडीमध्ये वाद झाले होते. पुढं त्यांनी किवळे लोढा येथून केतन अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पुढे एक फूड कोर्टवर ते चहा नाष्टा थांबले होते. तेव्हा सिया कशाच्या तरी बहाण्याने पुन्हा गाडीकडे आली गाडीतून काही सामान काढून खिशात ठेवले. ही बाब गाडीच्या ड्रायव्हरच्या निदर्शनात आली होती. पुढं जेव्हा ड्रायव्हरने सर्वांना मुंबई एअरपोर्टवर सोडले तेव्हा पुन्हा काही वेळात केतनचा ड्रायव्हरला फोन आला की माझं काही सामान गाडीमध्ये राहिल आहे. माझा पासपोर्ट राहिला आहे. दरम्यान सियाने पासपोर्ट फूड कोर्ट वरच काढून घेतला होता ही बाब गाडीच्या ड्रायव्हरच्या नजरेस आली होती असे वाहन चालकाने सांगितले.

Nasrapur Crime: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षेचा आज फैसला; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

आज आरोपींची पोलीस कोठडी संपणार

सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे. दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान काल हत्येचा उलगडा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी काल लोहगडावर जाऊन संपूर्ण घटनेचे थरारक पद्धतीने ‘सीन रीक्रिएशन’ केलं. मुख्य आरोपी सिया गोयलला पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी नेण्यात आलं जिथून केतनला दरीत ढकलण्यात आलं होतं. पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत थेट मानवी आकाराच्या ‘डमी’चा वापर केला. यानंतर आता सिया आणि चेतनची पोलिसांनी समोरासमोर चौकशी केली. तर लग्न रद्द करण्याऐवजी होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं तिने चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाली ट्रिपसाठी सिया आणि केतन कुठे जाणार होते?

    Ans: सिया आणि केतन प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते.

  • Que: वाहन चालकाने कोणता खुलासा केला?

    Ans: सिया प्रवासासाठी तयार नसल्याचे आणि फूड कोर्टजवळ पासपोर्टशी संबंधित हालचाल केल्याचे चालकाने सांगितले.

  • Que: पोलिसांनी लोहगडावर काय केले?

    Ans: पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत डमीच्या मदतीने हत्येचा घटनाक्रम पुन्हा उभा केला.

Web Title: Ketan agrawal case major twist in the lohagad murder case siya wasnt even willing to get into the car driver recounts the sequence of events regarding the bali trip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal
  • Ketan Agrawal Murder Case
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
1

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
2

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.