Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Case: एकाच रूममध्ये राहायचं नव्हतं म्हणून केतनचा काटा? सियाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयलच्या चौकशीत नवे खुलासे समोर येत आहेत. केतनसोबत एकाच रूममध्ये राहणे टाळण्यासाठी सियाने आधी बाली प्री-वेडिंग शूट रद्द करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पासपोर्ट प्रकरणानंतरही महाबळेश्वर मुक्काम टाळण्यासाठी लोहगडावर हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2026 | 11:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिया आणि चेतनवर केतनच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप.
  • बाली ट्रिपसाठी केतनचा पासपोर्ट गायब झाल्याचा तपासात खुलासा.
  • सिया-चेतनची पोलीस कोठडी संपल्याने आज न्यायालयात हजेरी होणार.
पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडात रोज नवीन खुलासे होत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिने प्रियकर चेतन चौधरी या दोघांची पोलीस कोठडीत चौकशी सुरु आहे. त्यावेळी सियाने चौकशीत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. सियाला केतनशी केवळ लग्नाचं टाळायचे नव्हते तर त्याच्यासोबत एकाच रूममध्ये मुक्काम देखील करायचे नव्हते. हा मुक्काम टाळण्यासाठी तिने बालीचं प्री-वेडिंग फोटोशूट रद्द करण्यापासून ते केतनच्या हत्येचा कट केल्याचे संपूर्ण तपासात उघड झाले.

बाली दौरा केला रद्द

१८ जून रोजी केतनची लोहगडावरून ढकलून देत सिया आणि चेतनने हत्या केली. सुरुवातील वाटले होते की हा निव्वळ अपघात आहे. मात्र अपघात नसून पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास करत हत्येचा कट उघडकीस आणला. मिळालेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांच्या विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. लग्नाचे हॉल आणि इतर सर्व बुकिंग पूर्ण झाले होते. ६ जून रोजी सिया आणि केतन हे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी ‘बाली’ (इंडोनेशिया) येथे जाणार होते. विमानाची तिकिटे आणि हॉटेल बुकिंग सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, बाली दौऱ्यात केतनसोबत तिला राहायचे नव्हते यामुळे केतनचा पासपोर्ट चोरला आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर फूड मॉलच्या स्वच्छतागृहात (टॉयलेट) फेकून दिला. पासपोर्ट अचानक गहाळ झाल्यामुळे केतनला बाली दौरा रद्द करावाला लागला होता. या पहिल्यावेळेस तीने आखलेला डाव यशस्वी झाला होता.

Nasrapur Crime: महाराष्ट्र हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात आज शिक्षा; फाशी की जन्मठेप? निर्णयाकडे लक्ष

महाबळेश्वरला एकाच खोलीत राहावं लागलं असत

१९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस संस्मरणीय ठरवण्यासाठी केतनने महाबळेश्वर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये खास सेलिब्रेशन आणि मुक्कामाचे (नाईट स्टे) नियोजन केले होते. मात्र, या ट्रिपदरम्यान केतनसोबत एकाच रूममध्ये राहावे लागेल या विचाराने सिया प्रचंड अस्वस्थ झाली होती. केतनसोबतचा हा मुक्काम कोणत्याही परिस्थितीत टाळायचा, याच एका विकृत हट्टापायी तिने वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा गेम करण्याचा अंतिम कट प्रियकर चेतनच्या मदतीने अमलात आणला आणि त्याची हत्या केली. लोणावळा ग्रामीण पोलीस या संपूर्ण धक्कादायक कबुलीनंतर न्यायालयासमोर पक्के पुरावे सादर करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

पोलीस कोठडी संपणार

दरम्यान आज आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपणार आहे. पोलीस आज न्यायालयात दोनीही आरोपींना हजर करणार आहे. दरम्यान काल हत्येचा उलगडा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी काल लोहगडावर जाऊन संपूर्ण घटनेचे थरारक पद्धतीने ‘सीन रीक्रिएशन’ केलं. मुख्य आरोपी सिया गोयलला पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी नेण्यात आलं जिथून केतनला दरीत ढकलण्यात आलं होतं.

Ketan Agrawal Case: लोहगड हत्याकांडात मोठा ट्विस्ट; ‘गाडीत बसायलाही तयार नव्हती सिया’, ड्रायव्हरने सांगितला बाली ट्रिपचा घटनाक्रम

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहेत?

    Ans: सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे मुख्य आरोपी आहेत.

  • Que: बाली ट्रिप का रद्द झाली होती?

    Ans: तपासानुसार, केतनचा पासपोर्ट गायब झाल्यामुळे बाली प्री-वेडिंग शूट रद्द झाल्याचे समोर आले आहे.

  • Que: पोलिसांनी लोहगडावर काय केले?

    Ans: पोलिसांनी घटनाक्रम समजून घेण्यासाठी लोहगडावर सीन रिक्रिएशन केले.

Web Title: Ketan agrawal case was ketan eliminated because he didnt want to share a room shocking revelations during siyas interrogation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal Murder Case
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.