Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case: डमी पुतळा, लोहगड किल्ला आणि सियाची उपस्थिती; पोलिसांनी पुन्हा उभा केला हत्येचा थरार

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर क्राईम सीन रिक्रिएट केला. मुख्य आरोपी सिया गोयलला घटनास्थळी नेऊन डमी पुतळ्याच्या मदतीने केतनला दरीत कसे ढकलण्यात आले, याचा तपास करण्यात आला. या प्रक्रियेतून मिळणारे पुरावे न्यायालयीन कारवाईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 03:56 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिया गोयलच्या उपस्थितीत लोहगडावर क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आले.
  • डमी पुतळ्याच्या मदतीने हत्येचा घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न.
  • पोलिसांकडून पुरावे आणि तपासातील महत्त्वाचे दुवे जोडण्याचे काम सुरू.
पुणे: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. लोहगड किल्ल्यावर घडलेल्या या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी थेट घटनास्थळी जाऊन क्राईम सीन रिक्रिएट केला. मुख्य आरोपी सिया गोयल हिलाही कडक बंदोबस्तात लोहगडावर नेण्यात आले. डमी पुतळ्याच्या मदतीने केतनला दरीत कशा प्रकारे ढकलण्यात आले, याचा तपास पोलिसांनी केला. या प्रक्रियेतून मिळणारे पुरावे पुढील न्यायालयीन कारवाईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

कलीम कुरेशी टोळीला पोलिसांचा मोठा दणका, थेट मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार

पर्यटकांसाठी किल्ला बंद

रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलिसांचे पथक सिया गोयलला घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहोचले. सुमारे अडीच तास म्हणजेच सकाळी १०:३० वाजेपर्यंत घटनास्थळावर ही तपास प्रक्रिया आणि पाहणी सुरू होती. या क्राईम सीन रिक्रिएशनदरम्यान कमालीची गुप्तता आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. तपास सुरू असेपर्यंत लोहगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात कोणत्याही पर्यटकाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला किल्ल्यावर प्रवेश दिला गेला नाही.

डमी पुतळ्याच्या साहाय्याने घटनाक्रम

केतन अग्रवाल हत्येचा गुंता सोडवण्यासाठी पोलीस आपल्यासोबत एक ‘डमी पुतळा’ घेऊन लोहगडावर पोहोचले होते. केतनला कसे लोहगडावरून ढकलण्यात आले याचा सिलसिलेवार तपास करण्यासाठी या डमी पुतळ्याची मदत घेण्यात आली. आरोपी सिया गोयल हिच्या उपस्थितीत पोलिसांनी कड्यावरून हा डमी पुतळा खाली ढकलून संपूर्ण घटनाक्रमाचे अत्यंत बारीकीने पुनरावलोकन केले. या तपासाच्या वेळी पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी स्वतः हजर होते. या क्राईम सीन रिक्रिएशनमधून मिळालेले पुरावे न्यायालयात आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

सियाला श्वास घेण्यास त्रास

दरम्यान, लोहगडावरील सियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सिया मास्क घालून आल्याचं दिसून येत आहे. सीन रिक्रिएट करुन झाल्यानंतर लोहगडावरुन खाली उतरताना सियाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे सियाने तोंडावरील मास्क काढले आणि थोडावेळ एकाच जागी थांबून मोठ्याने श्वास घेऊ लागली. यानंतर पुन्हा चेहऱ्यावर मास्क घालून सिया गोयल लोहगडावरुन खाली उतरली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही उपस्थित होता.

Chandrapur Crime: संतापजनक! ६१ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने केलं चिमुकलीवर अत्याचार; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी क्राईम सीन रिक्रिएशन कुठे केले?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आले.

  • Que: तपासासाठी पोलिसांनी कोणाचा वापर केला?

    Ans: घटनाक्रम समजून घेण्यासाठी डमी पुतळ्याचा वापर करण्यात आला.

  • Que: सिया गोयलला घटनास्थळी का नेण्यात आले?

    Ans: हत्येचा घटनाक्रम आणि तिची भूमिका समजून घेण्यासाठी तिला घटनास्थळी नेण्यात आले.

Web Title: Ketan agrawal murder case a dummy lohagad fort and siyas presence police reconstruct the chilling murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal
  • Pune
  • Pune Crime
  • Siya Goyal

संबंधित बातम्या

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ
1

Pune News: स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळात रस्त्यासाठी संघर्ष; आजारी रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Mumbai- Pune मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! कनेक्टिंग लिंक 3 तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
3

Mumbai- Pune मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! कनेक्टिंग लिंक 3 तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; विवाहाच्या आमिषाने पंजाबमधून पळवून आणले, जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले अन्…
4

अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव; विवाहाच्या आमिषाने पंजाबमधून पळवून आणले, जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.