Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासातून नवे खुलासे समोर येत आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची ओळख क्रिकेटच्या मैदानावर झाल्याचा तपासात दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात फोनवर संपर्क झाला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 27, 2026 | 10:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिया आणि चेतनची पहिली भेट क्रिकेट सामन्यादरम्यान झाल्याचे समोर आले.
  • दोघांमध्ये हजारो कॉल्स आणि तासन्तास संवाद झाल्याचा तपासात दावा.
  • सिया-चेतनच्या संबंधांची आणि हत्येच्या कटाची चौकशी सुरू.
पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. आता मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या प्रेमसंबंधाची सुरुवात कशी झाली. त्यांची पहिली भेट कशी झाली याचा खुलासा झाला आहे. एवढेच नाही तर काल पोलिसांनी सियाचा भाऊ साहिल याला ताब्यात घेऊन तब्ब्ल १० तास कसून चौकशी केली आहे. याचौकशीतून देखील अनेक खुलासे समोर आले आहेत. (Ketan Agrawal Murder Case)

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

कशी झाली सियाची आणि चेतनची भेट?

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली ओळख एका क्रिकेट सामन्यादरम्यान झाली होती. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन हे दोघेही एकत्र क्रिकेट खेळायचे. साहिलचे सामने पाहण्यासाठी आणि स्वतः खेळण्यासाठी सिया नेहमी भावासोबत जात होती. याच मैदानावर सिया आणि चेतनची पहिली भेट झाली. त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत हे दोघे पुन्हा समोरासमोर आले. या पार्टीनंतर त्यांच्यात नियमित भेटीगाठी वाढू लागल्या. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. पोलिसांनी या दोघांची सीडीआर तपासले असता यांच्यात तब्ब्ल २००४ वेळा फोनवर संपर्क झाला होता. या दोघांनी मिळून सुमारे 238 तास संवाद साधला होता. सियाच लग्न केतांसोबत ठरलं असतांनाही सिया आणि चेतन तासंतास एकमेकांच्या संपर्कात होते. या संवादादरम्यान केतनच्या हत्येचा कट रचण्यात आला असा संशय पोलिसांना आहे. (Ketan Agrawal Murder Case)

सियाचा भाऊ साहिलची १० तास चौकशी

चेतन हा सियाचा भाऊ साहिलचा जवळचा मित्र असल्याने पोलिसांना त्याला ताब्यात घेत १० तास चौकशी केली. त्याला या संपूर्ण कटाची माहिती आधीपासून होती का? किंवा त्याने नकळत या दोघांना मदत केली का? याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी काल साहिलला ताब्यात घेऊन तब्बल 10 तास चौकशी केली. (Ketan Agrawal Murder Case)

मोबाईल चॅट्स केले डिलीट

सिया आणि चेतन या दोघांमधील प्रेमसंबंध आणि हत्येच्या कटाची माहिती चुकूनही कोणाच्या हाती लागू नये, यासाठी या दोघांनी आपल्या मोबाईलमधील सर्व चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स डिलीट करून टाकले होते. आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले आहे. ते तातडीने फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये (Forensic Lab) पाठवले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने या मोबाईलमधील डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅट्स, मेसेजेस आणि इतर डेटा पुन्हा रिकव्हर केला जाणार आहे. हा डेटा हाती आल्यानंतर केतन अग्रवाल हत्येचा संपूर्ण कट कोर्टात सिद्ध करणे पोलिसांना अधिक सोपे होणार आहे. (Ketan Agrawal Murder Case)

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिया आणि चेतनची पहिली भेट कशी झाली?

    Ans: तपासानुसार दोघांची पहिली भेट क्रिकेटच्या मैदानावर झाली होती.

  • Que: पोलिसांना कोणत्या गोष्टींचा संशय आला?

    Ans: दोघांमधील मोठ्या प्रमाणातील फोन संपर्क आणि संवादामुळे पोलिसांचा संशय वाढला.

  • Que: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सध्या काय सुरू आहे?

    Ans: सिया आणि चेतनची चौकशी सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

Web Title: Ketan agrawal murder case how did siya and chetan first meet 2004 calls raised suspicions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agarwal
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…
3

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
4

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.