काय नेमकं घडलं?
मंजू संदीप पचारे (24, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी मंजूचा विवाह संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर संदीप हा दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करत होता. (Wardha Crime News) यामुळे मंजूने त्याचे घर सोडले. ती आपल्या वडिलांकडे वारीसपुरा, कामठी येथे राहू लागली. मंजूने पती संदीप याच्याविरोधात वर्धा येथील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल 25 जून 2026 रोजी लागला. शुक्रवारी सायंकाळी तिची हत्या केली. (Wardha Crime News)
मोबाईल घेऊन आरोपी फरार
शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मंजू शेतातून काम करून घरी आली. वारीसपुरा येथील घरी डबा ठेवून ती वडिलांसाठी पाण्याची बाटली घेऊन शुक्रवार बाजारातील दुकानाकडे निघाली होती. सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हिरणवार गल्लीत अज्ञात आरोपीने तिच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. मंजू रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी तिचा मोबाईल घेऊन शुक्रवार बाजाराच्या दिशेने पळून गेला.(Wardha Crime News)
पतीवर संशय
या प्रकरणी मंजूच्या वडिलांनी तिच्या घटस्फोटित पतीवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु आहे.(Wardha Crime News)
क्रूरतेची परिसीमा! हुंड्यासाठी छळ, मारहाण अन् पत्नीला माहेरी सोडून खाजगी व्हिडिओ केले व्हायरल
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेसोबत संतापजनक घटना घडली आहे. तिच्या पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी विवाहित महिलेचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळ केला, नाहीतर खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो तिच्या नातेवाईकांसह मित्रांजवळ प्रसारित केल्याचे समोर आले आहे. या घटनेने आरोपींवर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: मृत महिलेचे नाव मंजू संदीप पचारे (वय 24) असे आहे.
Ans: जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत ही घटना घडली.
Ans: मृत महिलेच्या वडिलांनी तिच्या पतीवर संशय व्यक्त केला आहे.






