Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case: केतनचं स्थळ दाखवलं तेव्हा सिया काय म्हणाली? सियाच्या आई-वडिलांच्या जबाबाने नवा ट्विस्ट

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या आई-वडिलांच्या चौकशीत नवे खुलासे समोर आले आहेत. सियाने केतनसोबत लग्न करायचे नसल्याचे सांगितले नव्हते, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना केला आहे. चेतनसोबतच्या संबंधांची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 09:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सियाच्या आई-वडिलांची पोलिसांनी साडेअकरा तास चौकशी केली.
  • लग्नासाठी सियावर दबाव नव्हता, असा कुटुंबीयांचा दावा.
  • चेतनसोबतच्या कथित संबंधांबाबत माहिती नसल्याचे सांगितले.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता सियाच्या कुटुंबीयांच्या जबाबामुळे नवा ट्विस्ट आला आहे. लोहगड किल्ल्यावर केतनला दरीत ढकलून हत्या केल्याच्या आरोपात अटक झालेल्या सिया गोयलच्या आई-वडिलांची पोलिसांनी तब्बल साडेअकरा तास चौकशी केली. या चौकशीत सियाने लग्नाला विरोध केला होता का, चेतनसोबतच्या नात्याची माहिती होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी जाणून घेतली. सियाने चौकशीत केतनसोबत लग्न करायचे नसल्याचे सांगितले होते, असा दावा केला होता. मात्र, तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हा दावा फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.

सियाच्या आई-वडिलांना चौकशीत विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न

प्रश्न : सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का?
उत्तर : सिया आणि चेतन मित्र आहेत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. सियाने चेतनबद्दल आम्हाला कधीचं काही सांगितलं नाही. त्यामुळं सिया आणि चेतनचे प्रेमसंबंध होते की नव्हते? याची आम्हाला काहीच कल्पना नाही.

प्रश्न : सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का?
उत्तर : सियाने चेतन नावाच्या मुलाशी लग्न करायचं आहे, असं एकदा ही सांगितलं नाही.

अडीच कोटींच्या सोन्यावर डल्ला? कलकत्त्यात दागिने बनविण्याच्या बहाण्याने 3.98 किलो सोने घेऊन सहा जण फरार

प्रश्न : सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का?
उत्तर : केतनचे स्थळ मित्तल यांनी आणलं. त्यावेळी आम्ही सियाला केतन अग्रवाल नावाच्या मुलाबाबत सांगितलं. त्याचे फोटो ही आम्ही तिला दाखवले. आधी तिची संमती घेतली आणि मगचं अग्रवाल कुटुंबीयांशी पुढची चर्चा झाली. लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सियाला केतन पसंत आहे का? याची आम्ही खात्री केली. तिचा होकार आल्यावरचं आम्ही लग्न करायचं ठरलं. तिची संमती होती, म्हणूनचं साखरपुडा ही घेण्यात आला.

प्रश्न : सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का?
उत्तर : लग्न ठरल्यापासून सिया आणि केतनचा संवाद सुरु होता. साखरपुडा झाल्यावर ते अनेकदा भेटले, फिरायला ही गेले. या दरम्यान केतन अनेकदा घरी पण आले, मात्र सियाने केतनचा स्वभाव पटत नाही. अशी तक्रार केली नाही.

प्रश्न : सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का?
उत्तर : सियाने मी केतनशी जबरदस्तीने लग्न करत आहे, असं एकदा ही म्हटलं नाही. ती आमची लाडकी लेक आहे, त्यामुळं आम्ही कोणतीही जबरदस्ती केलेली नाही.

प्रश्न : लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का?
उत्तर : याबाबत आम्हाला काहीचं कल्पना नव्हती

प्रश्न : साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का?
उत्तर : साहिलने स्वतः तो चेतनचा मित्र असल्याचं सांगितलं आहे. क्रिकेट खेळण्यासाठी ते एका मैदानावर भेटतात. साहिलचे तसे बरेच मित्र आहेत, त्यापैकी चेतन एक असू शकतो. मात्र साहिल आणि चेतनला आम्ही एकत्र कधी पाहिलं नाही.

प्रश्न : केतनच्या हत्येचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?
उत्तर : सियाने असं काही केलं असेल, यावर आमचा आज ही विश्वास बसत नाही. केतन आमच्या घरी यायचे, सियासोबत फिरायला जायचे. आम्ही नेहमीचं या दोघांना हसत-खेळत असल्याचं पाहिलंय. त्यामुळं असा काही कट रचला जातोय किंवा रचला गेलाय, याबद्दल मनात शंका येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

Ketan Agrawal Murder Case : ‘केतनचे डोके होते ठेचलेले, हातापायांवरही जखमा’; गायकवाड यांनी केला धक्कादायक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सियाच्या आई-वडिलांनी पोलिसांना काय सांगितले?

    Ans: सियाने केतनसोबत लग्न करायचे नाही असे कधी सांगितले नव्हते, असा दावा त्यांनी केला.

  • Que: सिया आणि चेतनच्या संबंधांबाबत कुटुंबीयांना माहिती होती का?

    Ans: सिया आणि चेतनच्या संबंधांची कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

  • Que: या प्रकरणाचा सध्या काय तपास सुरू आहे?

    Ans: पोलिस आरोपींचे जबाब, पुरावे आणि घटनाक्रमाची पडताळणी करत आहेत.

Web Title: Ketan agrawal murder case what did siya say when ketan was proposed as a match a new twist following the statements from siyas parents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal Murder Case
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…
3

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?
4

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.