Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोटे गुरुकुलात ‘रॅगिंग’चा नवा वाद; वर्गाच्या मॉनिटरवर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर गुन्हा दाखल

लोटे गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या रॅगिंग आणि गैरवर्तनाच्या नव्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. वर्गाच्या अल्पवयीन मॉनिटरवर इतर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 22, 2025 | 10:21 PM
लोटे गुरुकुलात 'रॅगिंग'चा नवा वाद (Photo Credit- X)

लोटे गुरुकुलात 'रॅगिंग'चा नवा वाद (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पोस्कोचे गुन्हे ताजे असतानाच खेडमध्ये खळबळ
  • लोटे गुरुकुलात ‘रॅगिंग’चा नवा वाद
  • गंभीर गुन्हा दाखल

खेड (रत्नागिरी): खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुल या अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत पुन्हा एक गंभीर वाद निर्माण झाला आहे. या गुरुकुलातील एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर, जो वर्गाचा मॉनिटर आहे, त्याने इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंभीर स्वरूपाचे आरोप

तक्रारीनुसार, वर्गाचा हा मॉनिटर इतर विद्यार्थ्यांचे आपल्या मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ काढायचा आणि त्यांना त्याद्वारे ब्लॅकमेल करत होता. याशिवाय, हा अल्पवयीन मॉनिटर गुरुकुलातील काही विद्यार्थ्यांना व्यसनजन्य पदार्थांचे सेवन (नशा) करण्यास भाग पाडत होता, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याचे पालक, चंद्रकांत हुलगप्पा धोत्रे (ता. चिपळूण) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर, त्या अल्पवयीन मॉनिटरवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२५ मध्ये घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत फटाक्यांचा बेफाम खेळ! रस्त्यावर हुल्लडबाज तरुणांचा जीवघेणा प्रकार

पोलीस कारवाई आणि मागील प्रकरण

या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०३१५/२०२५ असा गुन्हा भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ७४, ७९, १३१, ३५२, ३५१(२) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कोकरे महाराजांचे प्रकरण

गेल्या आठवड्यातच या गुरुकुलाचे प्रमुख ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्यावर विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या प्रकरणी पोक्सोचे (POCSO) दोन गुन्हे दाखल झाले आहेत. कोकरे महाराजांना न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रमुख महाराजांवरील पोक्सो प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून ‘रॅगिंग’सारखा हा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या नव्या प्रकरणामुळे गुरुकुलाच्या कार्यपद्धतीवर आणि प्रशासनावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या पुढील कठोर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या… , काकांनी केला 3 वर्षीय मुलीवर बलात्कार, गुप्तांगातून रक्त अन्…

Web Title: Khed lote gurukul monitor nude photos blackmail ragging case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 10:21 PM

Topics:  

  • crime news
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं
1

Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

1993 Bomb Blast: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषीसाठी दयेची मागणी; भाजप नेत्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्तांना पत्र
2

1993 Bomb Blast: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषीसाठी दयेची मागणी; भाजप नेत्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्तांना पत्र

‘समजलं तर ठीक, नाहीतर पुढच्यावेळी सरळ गोळी…’, कॅनडात पंजाबी गायक तेजी कहलोंवर गोळीबार, रोहित गोदारा गँगची दहशत
3

‘समजलं तर ठीक, नाहीतर पुढच्यावेळी सरळ गोळी…’, कॅनडात पंजाबी गायक तेजी कहलोंवर गोळीबार, रोहित गोदारा गँगची दहशत

चोरट्यांच्या दिवाळीवर फिरले पाणी! पोलिसांनी एकाच दिवसात केला 3 घरफोड्यांचा केला पर्दाफाश, तब्बल…
4

चोरट्यांच्या दिवाळीवर फिरले पाणी! पोलिसांनी एकाच दिवसात केला 3 घरफोड्यांचा केला पर्दाफाश, तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.