accident (फोटो सौजन्य: social media)
खोपोली: जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिला ठार तर चौघे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींचा उपचार खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात जुन्या मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात झाला. हेल्प फाउंडेशनसह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.
सासवड खूनप्रकरण: सहभाग आढळून येत नसल्याने गुन्ह्यातील आरोपीचा जामीन मंजूर
पुढे आलेल्या माहितीनुसार, खोपोलीच्या बोरघाटातून पुण्याकडे चालेल्या तृकांच्या चालकाने एचओसी ब्रीजजवळ अचानक ब्रेक मारला. ब्रेक मारल्याने ट्रक मधील लोखंडी पाईप बाहेर आले आणि ते मागून चालेल्या कार आणि दुचाकीवर धडकले. या अपघातात कारमध्ये असलेली महिला आणि दुचाकीवरील एक महिला ठार झाली आहे. तर चौघे जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे बोलले जात आहे. हेल्प फाउंडेशन सह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे.
‘स्मार्ट’ चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तपासातून धक्कादायक प्रकार उघड
पुण्यासारख्या शहरात चोरटे देखील ‘स्मार्ट’ झाल्याचे दिसत असून, एका चोरट्यांने महागड्या गाड्यांची चोरी करून त्या गाड्या विकण्यासाठी एक नवीन फंडा शोधून काढला. दुचाकी चोरुन त्याने फेसबूकवरील ‘मार्केट प्लेस’ या ‘ऑनलाईन पद्धतीने या दुचाकींच्या विक्रीची जाहिरात देऊन विक्री केल्याचे समोर आले आहे. त्याच्या या करामतीने पोलिसही हैराण झाले होते.
महादेव शिवाजी गरड (वय २६, रा. मांजरी बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या या स्मार्ट चोरट्याचे नाव आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पतंगे व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात वाहन चोरीची प्रचंड संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून वाहन चोरणाऱ्या सराईतांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यादरम्यान, युनिट पाचच्या पथकाने गुप्त माहितीवरून महादेव गरड याला पकडले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याच्याकडे सखोल तपास केला. तेव्हा त्याने वेगवेगळ्या भागातून तब्बल आणखी १२ दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्याबाबत माहिती घेतल्यानंतर त्याने या दुचाकी ऑनलाईन विक्री देखील केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
या पोलिस ठाण्यातील गुन्हे उघड
हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६, काळेपडळ पोलिस ठाण्याकडील ३, चिखली पोलिस ठाण्याकडील २ तसेच सांगवी पोलिस ठाण्याकडील ३ असे १४ गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून ८ लाख ४० हजार रुपयांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
गुंतवणुकीवर नफा देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ कोटींना घातला गंडा