फोटो सौजन्य: iStock
पुण्यातील सासवडमधील सोमडी गावात झालेल्या खूनप्रकरणातील एका आरोपीला न्यायालयाने अवघ्या १५ दिवसांत अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. अनुराग अठर भोसले असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात एकूण सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२१ जून रोजी धमकावल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून जय तनसिंग पवार (वय ४०) यांचा खून करण्यात आला होता. आरोपींनी टोळक्याने गावात जाऊन ही गंभीर घटना घडवली होती. यानंतर सासवड पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत होते.
गुंतवणुकीवर नफा देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ कोटींना घातला गंडा
अनुराग भोसले याच्या वतीने ॲड. मोनाली शेळके यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी पोलिसांच्या सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक तपासातून अनुरागचा गुन्ह्यात थेट सहभाग आढळून न आल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला.
ॲड. शेळके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, न्यायालयाने तांत्रिक पुरावे आणि सहभागाच्या अभावावर विश्वास ठेवत जामीन मंजूर केला.