Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं…, क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू

Kolhapur Crime News : कोल्हापूरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. क्रिकेट खेळताना 13 वर्षीय मुलगा चेंडू आणायला गेला आणि होत्याच नव्हतं झालं. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 06, 2025 | 01:02 PM
चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं..., क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू

चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं..., क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:
  • क्रिकेट खेळताना 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
  • मुलाचे नाव अफान असिफ बागवान असून तो फक्त १३ वर्षांचा होता
  • विजेचा धक्का इतका जोरदार होता की दुर्दैवाने मृत्यू
Kolhapur Crime News Marathi : कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येते. क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका शाळकरी मुलासोबत अचानक एक दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळे अख्खं कोल्हापूर हादरलं आहे. खेळताना मुलांचा किंचितसा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो, याचाच प्रत्यय देणारी एक घटना कोल्हापुरात घडली आहे.

शाळेला सुट्टी असल्याने आईला विचारून 13 वर्षीय विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत उत्साहात खेळत होता. परंतु क्रिकेट खेळण्याच्या नादात विद्यार्थ्यांने आपला जीव गमवावा लागला. मयत मुलाचे नाव अफान असिफ बागवान असून तो फक्त १३ वर्षांचा होता. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

लग्नाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेयसीने केला प्रियकरावर चाकूने वार; मोबाईलही केला फॉर्मेट आणि…

खेळ सुरू असताना त्यांचा चेंडू शेजारील हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीच्या टेसेवर गेला. म्हणून अफान टेरेसवर चेंडू घेण्यासाठी गेला. याच इमारतीवरून विमानतळाला वीजपुरवठा करणारी 11000 व्होल्टची हाय-टेन्शन पॉवर लाईन जाते. या चिमुकल्यांच्या त्याकडे लक्ष नाही गेलें.

टेरेसच्या अगद दीन-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या या विद्युत वाहिनीचा त्याचा संपर्क येताच, त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का इतका जोरदार होता की दुर्दैवाने या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत.

मित्रांसोबत क्रिकेटचा आनंद घेत असताना घडली दुर्दैवी घटना..

अफान हा वि.सा. खांडेकर प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत होता. शिक्षकांच्या संपामुळेशुक्रवारी शाळेला अघोषित सुट्टी असल्याने, सकाळी ११:३० च्या सुमारास एअरपोर्ट रोडजवळील मोकळ्या परिसरात क्रिकेट खेळण्यासाठी गेला. खेळताना मारलेला चेंडू शेजारच्या हनुमंत खांडेकर यांच्या बंगल्याच्या टेरेसवर गेला. बॉल घेण्यासाठी अफान टेरेसवर चढला. अचानक इमारतीच्या अगदी दीड-दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या 11000 व्होल्ट (11 केव्ही) क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचा त्याच्या गळ्याला स्पर्श झाला. जोरदार विद्युत धक्का बसताच तो खाली कोसळला आणि जागीच मृत्यू पावला.

भीषण अपघात

दरम्यान, कोल्हापूरमध्ये एक भीषण अपघात झाला. कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर चुये फाट्याजवळ व्हॅन आणि दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत आज दोघांचा मृत्यू झाला. चालक शिवाजी शंकर कोळी (४५ रोड कागल) आणि व्हॅन चालक अतुल अरविंद पाटील (३० रोड गुडाळ, रोड राधानगरी) अशी त्यांचे नावे आहेत. गजानन प्रभाकर चौगले (रा. तारळे), अनिल शिवाजी जाधव (रा. धामोड) आणि दुचाकीवरीवाल वैशाली शिवाजी कोळी आणि त्यांची नात सुप्रिया चेतन दळवी (३) जखमी झाले. इस्पुर्ली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी ‘तो’ झाला चोर; फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Web Title: Kolhapur crime 13 year old school boy dies while playing cricket news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • cricket
  • crime
  • kolhapur

संबंधित बातम्या

IND vs SA 3rd Toss Update : जिंकलो रे जिंकलो टाॅस जिंकलो… टीम इंडिया गोलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
1

IND vs SA 3rd Toss Update : जिंकलो रे जिंकलो टाॅस जिंकलो… टीम इंडिया गोलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

Kolhapur News : जनहित याचिकेची प्रशासनाने घेतली गंभीर दखल; रस्तेदुरुस्तीसाठी मनपाचं सकारात्मक पाऊल
2

Kolhapur News : जनहित याचिकेची प्रशासनाने घेतली गंभीर दखल; रस्तेदुरुस्तीसाठी मनपाचं सकारात्मक पाऊल

BCCI ने पुन्हा केलं करुण नायरला इग्नोर! दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोशल मिडियावर उडाला गोंधळ
3

BCCI ने पुन्हा केलं करुण नायरला इग्नोर! दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोशल मिडियावर उडाला गोंधळ

NZ vs WI : जस्टिन ग्रीव्हजने द्विशतकाने न्यूझीलंडला केले चकित, वेस्ट इंडिजसमोर 531 धावांचे लक्ष्य असताना सामना केला ड्राॅ
4

NZ vs WI : जस्टिन ग्रीव्हजने द्विशतकाने न्यूझीलंडला केले चकित, वेस्ट इंडिजसमोर 531 धावांचे लक्ष्य असताना सामना केला ड्राॅ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.