काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव भरतेश राजगोंडा टोपगोंडा (४० वर्षीय) असे आहे. भरतेश्वर हे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घरी निघाले होते. याचवेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरूनच त्यांचे चुलत भाऊ महावीर टोपगोंडा यांना कॉल केला. भरतेश्वर हा फ्लॉवरचे २५ लाख रुपये देणे लागतो असे सांगून त्यांनी पैसे घेऊन देण्यास सांगितले. त्यावेळी महावीर यांनी तुमच्यातील व्यवहार समोर बसून मिटवूया, असे सांगताच संशयितांनी फोन बंद केला. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली होती.
Pune Crime: पुण्यात झोपण्याच्या वादातून खून! वॉचमनने सहकाऱ्याचा गळा आवळून केला हत्या
अपहरणानंतर आरोपींनी तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती पुढे आली आहे. या कॉलमध्ये मोठी रक्कम घेऊन ठराविक ठिकाणी येण्याचा आदेश देण्यात आला. यानुसार भारतदेश यांचा भाऊ महावीर आणि त्याचे दोन मित्र सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र अपहरणकर्त्यांनी सतत लोकेशन बदलत त्यांना गोंधळात टाकले. काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला.
बॅटरीच्या करंटने केली हत्या
यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम राबविली होती. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये भरतेश्वर यांची गाडी आणि चप्पल सापडली. त्यानंतर त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला. पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. राजदीप अजय ताडे (२१), टिल्लू ऊर्फ मंथन राजेंद्र चंदुरे-पवार (२१, दोघे रा. दानोळी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बॅटरीचा करंट देऊन भरतेश्वर यांचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले. या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Kolhapur Crime: नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या…; कोल्हापुरात स्मशानभूमीत अघोरी विधीचा प्रकार उघड
Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात ही घटना घडली.
Ans: बॅटरीचा करंट देऊन व्यावसायिकाचा खून केला.
Ans: दोन आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.






