
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील महावीरनगरमध्ये नारायण भोसले व त्यांच्या पत्नी विजयमाला हे दोघेही राहत होते. त्यांची मुले चंद्रकांत आणि संजय ही व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात, तर सुनीला हा घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच राहतो. चंद्र्कांत व संजय हे दोघेही आई- वडिलांना भेटायला अधून-मधून गावी येत होते. सुनील हा नेहमीच किरकोळ कारणावरून आपल्या आई- वडिलांनसोबत भांडण करत होता. महिन्याभरापूर्वीच त्याने काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दोघांना दिली होती. मात्र माफी मागितल्याने त्याच्याविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली नाही.
हत्या केल्यानंतर शेजाऱ्यांना धमकी
वडिलांच्या डोक्यावर लाकडाने प्रहार केला तेव्हा शोकेस कपाटाची काच फुटली. त्याच काचेच्या त्याने आई-वडिलांच्या हाताच्या नसा कापल्या. त्यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. आई-वडिलांचा खून केल्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी सुनीलने बांबूचे दांडके, विळ्याचे पाते बाथरूममध्ये धुतलं, त्यानंतर त्याला आपल्या शेडजवळील दरवाजाच्या भिंतीजवळ नेऊन ठेवले. त्यानंतर, गेट बंद करून घराबाहेर निर्विकारपणे बसला. कुणी घराजवळ आल्यास त्यांना दगड फेकून मारण्याची धमकी तो देत होता. त्यामुळे घराजवळ जायला कुणी धाडस करत नव्हते.
चुलत वहिनीला फरशी फेकून मारली
पहाटे पावणेसहाच्या सुमारास घरात आरडाओरडा ऐकू येऊ लागला. आजुबाजुचे शेजारी राहणाऱ्या चुलत वहिनी राजमाता यांनी घरात भांडण सुरू असल्याचे मृतकाचा मुलगा संजय यांना फोनवरून कळवले. त्यानंतर, नेमके काय घडले, हे बघायला गेलेल्या राजमाता यांनाही सुनीलने फरशीचा तुकडा फेकून मारला.
पोलीस तपास सुरु
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला अटक केली असून घटनास्थळाचा पंचनामा केला. आईच्या अंथरुणात तिचं तुटलेले मंगळसूत्र आणि फुटलेल्या बांगड्यांचा खच सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. बांबूचे दांडके, विळ्याचे पाते देखील जप्त केले. हुपरीत भोसले यांचा दीड गुंठ्यांचा प्लॉट आहे, त्यातील अर्धा गुंठा वाटणीसाठी आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Raja Sonam Raghuvanshi Case: मास्टरमाइंड सोनम रघुवंशीला झटका, शिलांग कोर्टने जामीन याचिका फेटाळली
Ans: घराच्या वाटणीच्या वादातून.
Ans: मृत दाम्पत्यांचा मुलगा सुनील भोसले.
Ans: आरोपीने गुन्हा कबूल केला; अटक करून तपास सुरू आहे.