७०० हुन अधिक पानांच्या आरोपपत्रात काय?
‘लाइव्ह लॉ’च्या अहवालानुसार, या प्रकरणात मेघालय पोलिसांनी ७०० हुन अधिक पानांचा आरोपपत्र दाखल केला आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, राजा रघुवंशींची हत्या सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज सिंह कुशवाह यांनी मिळून आखली होती. या आरोपपत्रात भाड्याने सुपारी देऊन बोलावण्यात आलेल्या तीन कथित मारेकऱ्यांची नावेही नमूद आहेत. आकाश सिंह राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी असे नाव आहे. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी आरोपींवर खुनाचे आरोप निश्चित केले आहेत.
हा प्रकरण कसा आला उघडकीस
सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचा विवाह १२ मे रोजी झाला होता. हे जोडपे २३ मी रोजी मेघालायमध्ये हनीमूनदरम्यान बेपत्ता झाले. हे दोघे बेपत्ता झाल्यावर हा प्रकरण उघडकीस आला. नोंगियाट येथील एका होमस्टेमधून चेकआऊट करताना ते शेवटचे दिसले होते. काही दिवसांनी त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटी सोहरारिम परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आली.त्यानंतर बेपत्ता झाल्यानंतर सुमारे १० दिवसांनी, २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह पूर्व खासी हिल्समधील वेसावडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीत सापडला. राजाची पत्नी सोनम ही ८ जून पर्यंत बेपत्ता होती. ती उत्तरप्रदेशातील वाराणसी–गाझीपूर मुख्य रस्त्यावर एका ढाब्याजवळ आढळून आली. मेघालय पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, सोनम आणि 21 वर्षीय राज कुशवाहा हे दोघेही मिळून पतीच्या हत्येतील प्रमुख आरोपी असल्याचे मानले जात आहे.
Sangli Crime: तलवार, कुकरी, दगड… सांगलीत खुनांची मालिका; एकाच दिवशी दोन हत्या
Ans: हनीमूनदरम्यान बेपत्ता झाल्यानंतर 2 जून रोजी मृतदेह सापडल्यानंतर.
Ans: राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी.
Ans: शिलांग न्यायालयाने सोनमचा जामीन अर्ज फेटाळला.






