
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
प्रशांत आणि त्याची पत्नी अर्चना यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरु होते. याच वादातून अर्चना दीड वर्ष माहेरी राहिली होती. पाच महिन्यांपूर्वीच ती पुन्हा सासरी नांदायला आली होती. १७ डिसेंबररोजी सायंकाळी अर्चनाने मागील भांडणाची कुरापत काढून तिने प्रशांत दारूच्या नशेत असताना भांडण काढले. त्यावेळी तिने त्यांचे डोके भिंतीवर आपटले. नंतरदोरीने गळा आवळून त्यांचा खून केला. त्यानंतर तिने “पती बेशुद्ध पडला आहे” असा बनाव रचून दीर प्रवीण गायकवाड याला घरी बोलावले. प्रशांतला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शवविच्छेदन अहवालात स्पष्ट
सुरुवातीला अर्चनाने “पती दारू पिऊन मारहाण करत असताना, मी त्यांना स्वसंरक्षणार्थ ढकलले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला,” असा बनाव त्यांनी रचला होता. मात्र प्रशांतच्या शरीरावरील जखमा आणि गालावरील खुणा पाहून पोलिसांना संशय आला. तसेच शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
आधी उडवा उडवीचे उत्तरे नंतर…
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अहमदपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी अर्चनाची कसून चौकशी केली. आधी तिने उडवाउडवीची उत्तरे दिले मात्र पोलिसांनी धाक दाखवताच अर्चनाने आपला गुन्हा कबूल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अवघ्या काही तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे अहमदपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime: मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई! GST विभागाचा अधीक्षक 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
Ans: पत्नीने पतीचे डोके भिंतीवर आपटले व नंतर दोरीने गळा आवळला.
Ans: पती बेशुद्ध पडल्याचा बनाव करून अपघात असल्याचे सांगितले.
Ans: जखमा व शवविच्छेदन अहवालामुळे पोलिसांना संशय आला आणि आरोपीने कबुली दिली.