Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासवड येथे वकिलाची केली गेली फसवणूक; भागीदारीत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु करून…

आरोपी सागर गरुड हा फिर्यादी वकिलाचा सख्खा मेहुणा आहे आणि त्याच्या माध्यमातून एजंट मनिष भागणे याची ओळख झाली. तसेच गरुड यानेच फिर्यादीस मनीष भागणे याच्यासोबत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याचे सुचवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 16, 2026 | 03:04 PM
धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; 'तो' मेसेज आला अन्...

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; 'तो' मेसेज आला अन्...

Follow Us
Follow Us:

सासवड : एका प्रकरणात एका वकिलाने सख्ख्या मेहुण्याच्या विश्वासावातील मित्रासोबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. दिलेल्या रकमेची मागणी केल्यावर बंद खात्याचे धनादेश देवून फसवणुकीचा कळस गाठला. त्यामुळे संबंधित वकीलाने मेहुण्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अॅड. ज्ञानेश्वर सिताराम कराळे (वय ५९, रा. ज्ञानेश्वरी स.नं. ७/२, गाथा मंदिर रोड, देहूगाव ता. हवेली) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी फिर्यादी वकिलाचा मेहुणा सागर नामदेवराव गरूड (रा. यशोदिप हौसिंग सोसा. वारजे माळवाडी पुणे ५८) याच्यासह मनिष दिलीप भागणे (रा. ४६२, ३ रा मजला रामसुख विद्युत पासोड्या विठोबा मंदिराजवळ बुधवार पेठ, पुणे), अरूण हरिभाऊ मांजरे (रा. खेड शिवापूर, ता. भोर), अमोल शिंदे (रा. पुणे) आणि निलेश ज्ञानेश्वर गांगर्डे (रा. पिंपळे गुरव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२०२० ते जून २०२६ पर्यंत आरोपींचा वकिलाला फसवण्याचा खेळ सुरु होता. याबाबत सासवड पोलिसांनी सांगितले की, आरोपी सागर गरुड हा फिर्यादी वकिलाचा सख्खा मेहुणा आहे आणि त्याच्या माध्यमातून एजंट मनिष भागणे याची ओळख झाली. तसेच गरुड यानेच फिर्यादीस मनीष भागणे याच्यासोबत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याचे सुचवले. तसेच वकिलाने मेहुण्यावर विश्वास ठेवून भागीदारीमध्ये जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. २३ जुलै २०२० मध्ये मनिष भागणे याच्याबरोबर पुणे येथे रितसर रजिस्टर नोटराईज्ड भागीदारी करारनामा करून गजराज डेव्हलपर्स नावाने व्यवसाय सुरू केला.

भागीदारी संस्थेस लागणारे शॉप अॅक्ट, पॅनकार्ड ईत्यादी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १०० टक्के रक्कम वकिलाने लावण्याचे आणि येणाऱ्या नफ्यातील ४० टक्के हिस्सा देण्याचे ठरले. त्यानंतर आरोपी भणगे याने जमीन गट नंबर ३८८ मधील एकूण क्षेत्र २ हे. ४८ आर पैकी निलेष ज्ञानेश्वर गांगर्डे यांचे हिस्स्याचे ८० आर क्षेत्र रजिस्टर नोटर्राज्ड विसारपावती गजराज डेव्हलपर्सचे नावे करून घेवून ताब्यात घेतले. सदर विसार पावतीचे अगोदर मनिष भागणे यांना ही मिळकत घेण्यासाठी फिर्यादीने वेगवेगळ्या चेकद्वारे ४० लाख २० हजार आणि रोख स्वरुपात गरूड यांचे समक्ष २८०००० असे मिळून मनिष भागणे यांना एकूण ४३ लाख रुपये दिले.

आरोपी भागणे याने निलेश गांगर्डे याच्याकडून जमीन घेवून ३१ लाख रुपये विसारपावती पोटी दिले. तसेच जमिनीची देखभाल करण्यासाठी अरूण हरिभाऊ मांजरे (रा. खेडशिवापूर ता. हवेली) व अमोल शिंदे यांना नेमले. त्यानंतर गजराज डेव्हलपर्सचे नावाने करण्यात आलेली विसार पावती रद्द न करता अथवा फिर्यादीची कोणतीही संमती न घेता मनिष भागणे याने अरूण मांजरे, अमोल शिंदे यांचे नावे परस्पर सदर मिळकतीची पॉवर ऑफ अॅटर्नी करून दिली. याच आधारे प्रताप रामचंद्र शिंदे व शोभा प्रताप शिंदे (रा. बिबवेवाडी, पुणे) यांना २२ आर प्रतिगुंठा २७५००० व विलास गालिंदे यांना २२ गुंठे क्षेत्राची प्रतिगुंठा २, ६५००० रुपये प्रमाणे विक्री करून त्यांचेकडून रक्कम आपसांत वाटून घेतली.

त्यानंतर मनिष भागणे याने फिर्यादीस बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कसबा पेठ येथील नवनिर्मित महिला बचत गट यांच्या नावाचा ३५००००० चा नॉन सिटीयस चेक सागर गरूड याचे हस्ते दिला. परंतू सदरचे चेक बॅंकेने मागील साडेतीन वर्षांपूर्वीच बंद केले असल्याचे सांगून तो परत केला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी ज्ञानेश्वर कराळे यांनी मेहुणा सागर गरुड याच्यासह एजंट मनीष भागणे, हरिभाऊ मांजरे, अमोल शिंदे आणि निलेश गांगर्डे यांच्या विरोधात फसवणुक झाल्याचा गुन्हा दाखल केला.

Nashik Crime: लग्नासाठी हट्ट धरला, कुटुंबीयांनी होकार दिला अन् दुसऱ्याच दिवशी प्रियकराचा खून

Web Title: Lawyer defrauded in saswad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Saswad News

संबंधित बातम्या

Pune Fraud Case: वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त; महापालिकेचा क्लिनिकवर छापा
1

Pune Fraud Case: वारजेत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, ॲलोपॅथी औषधांचा साठा जप्त; महापालिकेचा क्लिनिकवर छापा

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
2

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
3

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
4

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.