Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lilavati Hospital : लीलावती रुग्णालयात काळी जादू? जमिनीखाली आढळले मानवी अवशेष असलेली आठ मडकी, तांदूळ, केस

Lilavati Hospital News: लीलावती रुग्णालयातील १२५० कोटींच्या घोटाळ्याने प्रकरण तापले असताना, रुग्णालयात काळी जादू केल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.नेमकं काय आहे प्रकरण?

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 13, 2025 | 11:41 AM
लीलावती रुग्णालयात काळी जादू? जमिनीखाली आढळले मानवी अवशेष असलेली आठ मडकी, तांदूळ, केस

लीलावती रुग्णालयात काळी जादू? जमिनीखाली आढळले मानवी अवशेष असलेली आठ मडकी, तांदूळ, केस

Follow Us
Close
Follow Us:

Lilavati Hospital News In Marathi: मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालय चालवणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींवर १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप केला आहे. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय आणि वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. ट्रस्टने असाही दावा केला आहे की, माजी विश्वस्त आणि त्यांचे सहकारी रुग्णालयाच्या परिसरात काळी जादू करत होते. ट्रस्टचा दावा आहे की काळ्या जादूशी संबंधित काही साहित्य, जसे की मानवी अवशेष, मडकी अशा अनेक गोष्टी रुग्णालयाच्या आवारात दिसन आले आहे. नेमकं काय आहे प्रकरण ?

 गॅस सिलिंडरच्या वाहनाने रुग्णालय उडवून देण्याची धमकी; पोलिसांत तक्रार येताच गुन्हा झाला दाखल

लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने गेल्या २० वर्षात लीलावती रुग्णालयात १,२५० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी १७ जणांविरुद्ध खटला दाखल केला आहे. याप्रकरणी पत्रकार परिषदेत लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी ही माहिती दिली. याचदरम्यान, त्याने आणखी एक धक्कादायक माहिती दिली, ती म्हणजे लीलावती रुग्णालयात काळी जादू केली जात आहे. परमबीर सिंह म्हणाले की, ट्रस्टच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती की, कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता आणि त्यांची आई चारू मेहता ज्या कार्यालयात बसतात तिथे काळी जादू केली जात आहे.

ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू, अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती. त्याआधारे संबंधित कार्यालयात खोदकाम केले असता तेथे मानवी अवशेष असलेली आठ मडकी, तांदूळ, केस आणि कर्मकांडांसाठी आवश्यक सामग्री सापडल्याचा दावा कार्यकारी संचालक परमबीर सिंह यांनी केला. तसेच “कार्यालयाच्या फरशीचे उत्खनन केले असता, मानवी अवशेष, तांदूळ, मानवी केस आणि इतर काळ्या जादूच्या साहित्याने भरलेले आठ भांडे पुरलेले आढळले,” असे माजी पोलिस आयुक्त म्हणाले. पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यानंतर, आम्ही वांद्रे न्यायालयात धाव घेतली आणि आता दंडाधिकारी स्वतः बीएनएसएसच्या कलम २२८ अंतर्गत प्रकरणाची चौकशी करत आहेत.

लीलावती रुग्णालयात घोटाळा?

लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापन सध्याच्या संचालक मंडळाने ताब्यात घेतल्यानंतर, माजी संचालक मंडळावर शेकडो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला. म्हणून संचालक मंडळाने कामकाजातील अनियमितता उघड करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली.

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्ट फंडचे परदेशी खात्यांमध्ये बेकायदेशीर हस्तांतरण, कायदेशीर खर्चाच्या स्वरूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, फसव्या गुंतवणूक आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी अशा गंभीर अनियमितता आढळून आल्या. तसेच, फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सुमारे १२५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आली. या कारवाईमुळे ट्रस्टच्या आर्थिक अखंडतेला धक्का बसला आहे. यानंतर कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत किशोर मेहता (५५) यांनी माजी विश्वस्तांसह १७ जणांविरुद्ध वांद्रे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

दरम्यान पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्यावर त्यांनी वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल केली. लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, न्यायालयाने वांद्रे पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

Pune Crime: आनंदोत्सव की भितीदायक माहोल..! ‘फर्ग्युसन रस्त्यावर हाणामारी; नेमके प्रकरण काय?

Web Title: Lilavati hospital black magic news in marathi founders family feud rs 1200 crore fraud eight urns of black magic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!
1

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!

Nanded Crime: नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ गोळीबाराचा थरार; 24 तासांत पोलिसांची मोठी कारवाई, दोन्ही गटांतील 10 आरोपी अटकेत
2

Nanded Crime: नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ गोळीबाराचा थरार; 24 तासांत पोलिसांची मोठी कारवाई, दोन्ही गटांतील 10 आरोपी अटकेत

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा
3

DHULE : धुळे शहरात भाजप प्रचाराला वेग; एकवीरा देवी मंदिर परिसरात आज जाहीर सभा

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा
4

Mumbai : २० वर्षांनंतर शिवसेना भवनात राज ठाकरे, ठाकरे बंधूंच्या वचननाम्याची राजकीय चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.