शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करत काढायला लावल्या उठाबशा; शिरूर तालुक्यात घडला खळबळजनक प्रकार (फोटो - istockphoto/टीम नवराष्ट्र)
पुणे: भारत-न्यूझीलंड सामन्यात भारताना विजय मिळविल्यानंतर फर्ग्युसन रस्त्यावर तरुणाईची आलोट गर्दी झाली. पण तरुणाईचा हा आनंदोत्सव की धडकी भरवणारा माहोल आहे, असा प्रश्न उपस्थित झाला असून, ट्रिपलसीट, गाड्यांचा कर्णकश आवाज, सायलेन्सरमधून निघणारा फटाक्यांचा आवाज, प्रचंड आरडाओरडा अन् सुसाट गाड्यांनी डेक्कनचा परिसर रात्री दणाणून गेला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी तर झालीच पण ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांमध्ये भितीदायक माहोल होता. त्यामुळे हा आनंदोत्सव की भितीदायक माहोल, असा प्रश्न पुणेकर विचारू लागले आहेत.
दुसरीकडे काल मारहाणीच्या दोन घटना घडल्या आहेत. फर्ग्युसन रस्त्यावर धक्का लागला म्हणून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तर मॅच पाहण्यास गेलेल्या तरुणावर टोळक्याचा हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात पोलिसांनी एकूण सात ते आठ जणांवर सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
भारत-न्यूझीलंडचा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत थरारकरित्या झाला. भारताने ही मालिका जिंकली आणि देशात एकच जल्लोष झाला. पुण्यातही तरुणाईसह अनेकांनी आनदोत्सव साजरा केला. पण, तरूणाईकडून या जल्लोषाला आता हळू हळू भितीदायक असे वळ लागू लागले आहे. सामना जिंकल्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या परिसरातून (विशेषत: महाविद्यालयांच्या परिसर) तरुणाई एफसी रोडवर आली. पण, येतानाच ह्या तरुणाईने नियमांना तर हारताळ फासलाच पण, वाहतूकीचे नियम, पुण्याची सज्जनता आणि शांतता मोडीत काढली.
दुचाकींवर ट्रिपलशीट, दुचाकींचा अतिवेग, त्यात दुचाकींवर उभा राहून आरडाओरडा. तर, काही गाड्यांचा “फटाक्यांचा” आवाज काढत ही तरूणाई एफसी रोडवर आवतरली. त्यांनी ना सिग्नल पाळले ना, नियम. तर त्यांच्या आरडा-ओरड्याने सर्वसामान्य पुणेकर तसेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले व महिलांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. अनेकठिकाणी चौक जाम झाले. कशाही गाड्या दामटल्याने मोठी कोंडी झाली. दुसरीकडे चारचाकींत उभा राहून त्यांचाही वेग मोठा व गाण्यांचा आवाज करत रोडवरून सुसाट गाड्या धावल्या. या सर्वांना एफसी रोडवर यायचे असल्याने या परिसरात मोठी गर्दी देखील जमली होती. त्यामुळे आपसूकच त्यातून घटनाही घडल्या.
दोन गटात धक्का लागला म्हणून तुंबळ हाणामारी झाली. बेल्टने एकमेकांना बेदम मारहाण झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. पोलिसांना देखील ही गर्दी आवरता-आवरता नाकी नऊ आला होता. पोलीस आनंद म्हणून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असले तरी या आनंदोत्सवाचा आतेरिक नको, असे पोलीस व पुणेकर म्हणू लागले आहेत.
मॅच पाहण्यास गेलेल्या तरुणावर टोळक्याचा हल्ला
भारत-न्यझीलंड सामना पाहण्यास चिमण्या गणपती चौकात गेलेल्या तरूणावर कोयत्याने वार करून मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडक पोलिसांत १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अक्षय दत्तात्रय वाघ यांनी तक्रार दिली आहे. अक्षय वाघ मशीन ऑपरेटर म्हणून नोकरी करतो.तो चिमण्या गणतपी चौकात सामना पाहण्यास आला होता. सामना झाल्यानंतर साडे दहाच्या सुमारास अक्षय घरी जात होता. रस्ता क्रॉस करताना दोघांनी त्यांची गाडी थांबवली. त्यांनी अक्षयशी वाद घातला. त्यावेळी ऋषीकेश शितोळेने भांडणे सोडवले. पण, दोघांनी तुला थोड्या वेळात बघून घेतो म्हणत धमकावले. नंतर अक्षय मित्रांसोबत गप्पा मारताना असताना दुचाकीवर टोळक्याने येऊन मारहाण केली.