लोणावळा: लोणावळा शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत २ किलो ७० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
६ ऑगस्ट रोजी रात्री ९.४६ वाजता, जयचंद चौक परिसरात मोटारसायकलवरून गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अब्दुल करीम शेख (वय ३८, रा. गुरव वस्ती, कुसगाव) याला गांजा विकताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २ किलो ७० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि मोटारसायकल असा १.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी तनवीर शेख याचा शोध सुरू आहे.
गेल्याच आठवड्यात लोणावळा नगरपरिषदेच्या बैठकीत मावळ आमदार सुनील शेळके यांनी अंमली पदार्थ विक्रीबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई करत शहरात गुन्हेगारी रोखण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. लोणावळा नशामुक्त करण्यासाठी पोलीस सज्ज झाले असून, ही कारवाई त्या मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी तरुणांकडून ड्रग्जचे सेवन
दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), ने अलीकडेच प्रकाशित केलेल्या संशोधनात धक्कादायक खुलासा केला आहे. इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्री, २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, देशातील तरुण पिढी लैंगिक क्रियाकलापादरम्यान त्यांची क्षमता वाढवण्यासाठी ड्रग्जचा वापर करत आहेत. परिणामी या ड्रग्जमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे एचआयव्ही, हेपेटायटीससह मानसिक आजारांचा धोकाही वाढत आहे. एम्सच्या डॉक्टरांनी या गोष्टीला केमसेक्स असे नाव दिले आहे. हे केमिकल आणि सेक्स या दोन शब्दांपासून बनलेले आहे. म्हणजेच शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी औषधाचा डोस घेणे. संशोधनातून असे दिसून आले आहे की आता परदेशांप्रमाणेच भारतातील तरुण या ट्रेंडचे अनुसरण करत आहेत.
धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
एम्स दिल्लीच्या नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर (एनडीडीटीसी) ने हे संशोधन केले आहे. एम्स एनडीडीटीसी येथे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ सरकार, प्राध्यापक डॉ. अंजू धवन आणि वरिष्ठ निवासी डॉ. वर्षा यांनी हा अभ्यास केला आहे. अहवालाचे शीर्षक आहे भारतातील केमसेक्स समजून घेण्यासाठी एक ऑनलाइन अभ्यास. हे सर्वेक्षण सोशल मीडियाद्वारे करण्यात आले आणि त्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अशा तरुणांचा समावेश होता ज्यांनी किमान एकदा लैंगिक संबंध ठेवले आहेत. एम्स दिल्लीचा हा पहिलाच ऑनलाइन अभ्यास आहे. यात शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी ड्रग्ज घेण्याच्या पद्धतीचे आणि त्याशी संबंधित धोक्यांचे वर्णन केले आहे.