• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • The Risk Of Lung Cancer Is Increased Even Without Smoking

धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

आज १५-२०% फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण हे ‘नॉन-स्मोकर’ आहेत. विशेष म्हणजे या गटात शहरांतील तरुण वर्ग तसेच, गृहिणींचाही समावेश आहे. महिलांमध्ये तर हा धोका झपाट्याने वाढत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2025 | 04:46 PM
धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

फुफ्फुसाचा कर्करोग म्हटलं की, बहुतेक लोकांना लगेच सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीचं चित्र डोळ्यापुढे येतं. पण ही प्रतिमा आता चुकीची ठरतेय. भारतात दरवर्षी असे हजारो रुग्ण सापडत आहेत, जे कधीच तंबाखूच्या धुराच्या संपर्कात देखील आलेले नसतात. त्यांना पूर्वी काही लक्षणं नसतात, पण जेव्हा निदान होते तेव्हा रोग आटोक्याबाहेर गेलेला असतो. एका भारतीय अभ्यासानुसार, आज १५-२०% फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण हे ‘नॉन-स्मोकर’ आहेत. विशेष म्हणजे या गटात शहरांतील तरुण वर्ग तसेच, गृहिणींचाही समावेश आहे. महिलांमध्ये तर हा धोका झपाट्याने वाढत आहे.

फुफ्फुसाचा कर्करोग ‘सायलेंट किलर’ ठरण्यामागची कारणे काय?

धूम्रपानाशिवायही भारतात फुफ्फुसं खराब करणारे अनेक अदृश्य धोके आहेत. शहरांतील वाढते वायुप्रदूषण, घरगुती चुलींसाठी वापरले जाणारे जैविक इंधन, जुन्या घरी असणारे रॅडॉन गॅस किंवा अस्बेस्टॉसचे कण, पूर्वीचे टी.बी. संक्रमणामुळे झालेले फुफ्फुसांतील स्कारिंग – हे सगळं एकत्रितपणे कर्करोगाचा धोका वाढवत आहे. त्यामुळे ‘नॉन-स्मोकर’साठीही हा रोग एक मोठं संकट बनतोय. पण खरी धोक्याची घंटा वाजते ती ‘उशिरा निदान’ झाल्यामुळे. सुरुवातीची लक्षणं सौम्य असतात, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि निदान झालं तेव्हा वेळ हातून निसटली असते.

जर तुमचा खोकला आठवड्यानंतरही थांबत नसेल, तर तो दुर्लक्षित करू नका. पावसाळ्यातील अ‍ॅलर्जी किंवा प्रदूषणमुळे खोकला होणं सामान्य आहे, पण नेहमीचे औषधोपचार निष्फळ ठरत असतील तर छातीचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन गरजेचा असतो. श्वास घ्यायला त्रास होणं, अगदी जिने चढताना दम लागणं, अंगात थकवा जाणवणं, अचानक वजन कमी होणं – ही लक्षणं कधीच हलक्यात घेऊ नयेत. छातीत दुखणं, तेही हसताना, श्वास घेताना किंवा खोकताना वाढत असेल तर तात्काळ तपासणी आवश्यक आहे.

जर वारंवार ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनियाचे झटके येत असतील, आवाज कायम भरकल्यासारखा वाटत असेल किंवा चेहरा व गळ्याला सूज येत असेल, तर हे लक्षणं गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. भारतीय समाजात ‘थोडं थांबून बघू’ ही वृत्ती आहे. परंतु फुफ्फुसाच्या कर्करोगात वेळ खूप महत्वाची असते. विशेषतः वायुप्रदूषणाने वेढलेल्या आपल्या देशात, वेळेत निदान हेच एकमेव उपाय आहे. लक्षणं कायमस्वरूपी दिसत असतील तर डॉक्टरांकडे जाणं टाळू नका.

आजच योग्य पावलं उचला – घरातील हवा शुद्ध ठेवा, धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कापासून दूर राहा, स्वयंपाकघरात वायुवीजन उत्तम ठेवा आणि गरज असल्यास लो-डोस सीटी स्कॅन करून घ्या.

लेखक : डॉ. स्वप्नील बरावकर,

MBBS MD (पल्मनरी मेडिसिन), आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल

Web Title: The risk of lung cancer is increased even without smoking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • Doctor
  • Doctors News
  • smoking

संबंधित बातम्या

उशीर होण्याआधी वेळीच ओळखा बालकांमधील दृष्टिदोष
1

उशीर होण्याआधी वेळीच ओळखा बालकांमधील दृष्टिदोष

नोकरदार महिलांमध्ये वाढतेय धूम्रपानाचे प्रमाण; ताण कमी करण्यासाठी घेतला जातोय आधार
2

नोकरदार महिलांमध्ये वाढतेय धूम्रपानाचे प्रमाण; ताण कमी करण्यासाठी घेतला जातोय आधार

गडचिरोली जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; डॉक्टर पत्नीला औषधोपचार करताना अटक
3

गडचिरोली जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; डॉक्टर पत्नीला औषधोपचार करताना अटक

सोनोग्राफीसाठी तासभर उभी महिला, डॉक्टर मात्र गाढ झोपेत!
4

सोनोग्राफीसाठी तासभर उभी महिला, डॉक्टर मात्र गाढ झोपेत!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुशीला कार्कींची मोठी घोषणा; हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीदांचा दर्जा अन् पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई

सुशीला कार्कींची मोठी घोषणा; हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीदांचा दर्जा अन् पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई

Shani Gochar 2025: शनिच्या नक्षत्रातील बदलामुळे या राशींच्या लोकांचे चमकेल नशीब, करिअरमध्ये होईल बदल

Shani Gochar 2025: शनिच्या नक्षत्रातील बदलामुळे या राशींच्या लोकांचे चमकेल नशीब, करिअरमध्ये होईल बदल

‘साऊथचे स्टार बॉलिवूडच्या अभिनेत्यांपेक्षा”… सयाजी शिंदेंच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा

‘साऊथचे स्टार बॉलिवूडच्या अभिनेत्यांपेक्षा”… सयाजी शिंदेंच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा

नवरात्री उत्सवात लेहेंग्यावर घ्या ‘या’ डिझाईनचे ऑक्सिडाईज नेकलेस, लेटेस्ट पॅटर्न दागिने अंगावर दिसतील शोभून

नवरात्री उत्सवात लेहेंग्यावर घ्या ‘या’ डिझाईनचे ऑक्सिडाईज नेकलेस, लेटेस्ट पॅटर्न दागिने अंगावर दिसतील शोभून

आयुष कोमकरच्या हत्येनंतर अजित पवारांची प्रतिक्रीया; केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

आयुष कोमकरच्या हत्येनंतर अजित पवारांची प्रतिक्रीया; केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; ‘या’ पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा

भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; ‘या’ पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा

दिल्लीसह १५ राज्यांमध्ये पुन्हा वरुणराज कोसळणार; उत्तराखंड अन् जम्मू-काश्मीरला यलो अलर्ट

दिल्लीसह १५ राज्यांमध्ये पुन्हा वरुणराज कोसळणार; उत्तराखंड अन् जम्मू-काश्मीरला यलो अलर्ट

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन  होणार अधिक सुरक्षित

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन होणार अधिक सुरक्षित

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Navi Mumbai : उलवे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलासह दोघांना अटक

Navi Mumbai : उलवे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलासह दोघांना अटक

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

नवी मुंबईत गणेश नाईक यांचा वाढदिवस सामाजिक-आरोग्य-क्रीडा उपक्रमांतून साजरा

नवी मुंबईत गणेश नाईक यांचा वाढदिवस सामाजिक-आरोग्य-क्रीडा उपक्रमांतून साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.