
Lonavala Tiger Point: मुसळधार पाऊस, ४०० फूट खोल दरी आणि एक फोन call; लोणावळ्यातील 'त्या' रात्रीचं थरारक रहस्य!
अनिकेत भीमा साबळे (वय २०, रा. रामनगर, भुशी, लोणावळा) असे खोल दरीत मृत अवस्थेत सापडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. घटना घडली ती वेळ रात्रीची असल्याने, सततचा पाऊस आणि दरीचा धोकादायक भूगोल विचारात घेऊन पोलिसांनी ‘शिवदुर्ग मित्र’ आपत्कालीन पथकाच्या मदतीने २ नोव्हेंबर रोजी भल्या पहाटे बचाव मोहीम राबवण्याचे निश्चित केले. सोमवारी सकाळी पोलीस आणि ‘शिवदुर्ग मित्र’चे निष्णात बचावकर्ते घटनास्थळी दाखल झाले. पथकातील मावळ्यांनी सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेत तब्बल ४०० फूट खोल दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली.
अत्यंत बिकट आणि निसरड्या परिस्थितीत सुमारे अडीच तास ही शोधमोहीम चालली. अखेर अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दरीच्या तळाशी तरुणाचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. त्यानंतर दोरखंड आणि स्ट्रेचरच्या साहाय्याने अत्यंत धाडसाने मृतदेह ४०० फूट दरीतून वर आणून लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. हा केवळ एक भीषण अपघात होता की आत्महत्या? यादृष्टीने पोलीस आता सर्व अंगांनी तपास करत आहेत. या मोहिमेत शिवदुर्ग पथकाच्या उंबरे, हर्ष तोंडे, प्रिन्स बैठा, महेश मसने, गणेश भांगरे, भावेश दानवे, आनंद गावडे, शैलेश उंबरे, साहेबराव चव्हाण, महादेव भवर, पिंटू मानकर, संतोष मरगळे व सुनील गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले.
Ans: लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंटवरून २० वर्षीय तरुण ४०० फूट खोल दरीत पडल्याची आणि त्याचा मृतदेह आढळल्याची घटना घडली.
Ans: मृत तरुणाचे नाव अनिकेत भीमा साबळे (वय २०, रा. रामनगर, भुशी, लोणावळा) असे आहे.
Ans: लोणावळा ग्रामीण पोलीस आणि ‘शिवदुर्ग मित्र’च्या आपत्कालीन पथकाने ४०० फूट खोल दरीत उतरून अडीच तास शोधमोहीम राबवत मृतदेह बाहेर काढला.