
Pune Accident News: "मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला..." ताम्हिणी घाटात भीषण अपघात; डॉक्टरच्या तरुण मुलीने गमावले प्राण!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा मनोज गोरे (वय २७) असे अपघातात प्राण गमावलेल्या तरुणीचे नाव आहे. पूजा हिचे वडील पेशाने डॉक्टर असून ते पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास आहेत. तर या अपघातात मंजीत संजय शर्मा (वय ३२) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. पूजा आणि मंजीत हे दोघे दुचाकीवरून पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करत होते. ताम्हिणी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर आले असता, चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
हेही वाचा:Mahadev App : महादेव ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर भारतात; ओमानमधून सीबीआयने आणले मायदेशी
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजा आणि मंजीत यांना तातडीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच पूजाचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दुसरीकडे, गंभीर जखमी झालेला मंजीत शर्मा याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी माणगाव आणि महामार्ग पोलीस अपघाताच्या कारणाचा अधिक तपास करत आहेत.
Ans: मृत पावलेल्या तरुणीचे नाव पूजा मनोज गोरे (वय २७, रा. पिंपरी-चिंचवड) असे आहे, ती पेशाने डॉक्टर असलेल्या वडिलांची मुलगी होती.
Ans: हा अपघात ताम्हिणी घाटात पुण्याहून माणगावच्या दिशेने जाताना धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घडला.
Ans: जखमी तरुणाचे नाव मंजीत संजय शर्मा (वय ३२) असून, त्याच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती गंभीर आहे.