सौजन्य फोटो - AI Gemini
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकन्या हिचा विवाह २०१९ मध्ये सुनील बदने याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही वर्षे त्यांचा संसार सुरळीत चालला. मात्र, त्यानंतर पतीने तिला दारू पिऊन मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, पतीचे इतर महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे देवकन्याच्या निदर्शनास आले. याबाबत तिने हा प्रकार आपल्या माहेरच्या मंडळींना सांगितला होता.
नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी एकत्र येऊन पती सुनील याची समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. याउलट पतीकडून होणारा सततचा मानसिक आणि शारीरिक त्रास अधिकच वाढला. या सर्व त्रासाला आणि अपमानाला कंटाळून देवकन्या हिने राहत्या घरी बाथरुम साफ करण्याचे ॲसिड प्राशन केले. विषबाधेमुळे तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी लातूर येथे उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वडिलांच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार आरोपी पती सुनील बदने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक अनमोल keदार करीत आहेत. पतीच्या अनैतिक संबंध आणि छळामुळे एका तरुण संसार उद्धव्वस्त झाल्याने परळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील सिद्धार्थनगर भागात घडली आहे.
Ans: देवकन्या सुनील बदने (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव असून, पतीच्या अनैतिक संबंधांना व सततच्या छळाला कंटाळून तिने ॲसिड प्राशन करून आत्महत्या केली.
Ans: मयत युवतीचे वडील श्रीमंत पंढरी गित्ते यांच्या तक्रारीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात पती सुनील सुरेश बदने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






