कोल्हापूरच्या चंदगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; चार गांजा विक्रेत्यांना अटक
कदमवाकवस्ती : राज्यात चोरटा्यांचा सुळसुळाट सुरु असून बंद घरे फोडून चोरटे लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. यामुळे पोलिसही कारवाई करण्यासाठी अॅक्शन मोडवर आले आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कदमवाकवस्ती परिसरातील एका घरफोडीच्या गुन्ह्यात लोणी काळभोर पोलिसांनी केवळ ९ दिवसांत तपास करत मध्यप्रदेशातून अट्टल चोराला अटक केली आहे. प्रतिक हिराचंद लिडकर (वय ३१, रा. खंडवा, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
दिनांक १२ जुलै २०२५ रोजी शौकत शब्बीर मोगल हे कुटुंबासह बार्शी येथे गेले असता, त्यांच्या राहत्या घरात चोरी झाली होती. १४ जुलै रोजी घरी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले, कपाटाचे लॉक उचकटलेले व सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल चोरीस गेल्याचे आढळले. त्यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांची मदत आणि सततची तपास मोहीम राबवली. आरोपी प्रतिक हिराचंद लिडकर (वय ३१, रा. खंडवा, मध्यप्रदेश) याचा तपासातून सुगावा लागल्यावर पोलिसांचे विशेष पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. तिथे सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडून एकूण ६,३९,९००/- रुपयांचा ऐवज, ज्यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल यांचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर याआधीही महाराष्ट्र व मध्यप्रदेशमध्ये एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे निरीक्षक स्मिता पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर यांच्यासह संपूर्ण तपास पथकाने केली. अतिशय कौशल्यपूर्ण तपासाद्वारे बाहेरील राज्यातील आरोपीला अटक करून १०० टक्के माल जप्त करण्याची ही उल्लेखनीय कारवाई ठरली आहे.
लष्कर पोलिसांच्या पथकाचीही मोठी कारवाई
लष्कर तसेच कोंढवा भागात बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली असून, दोन गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. दोन गुन्हेगार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. आर्यन अजय माने उर्फ मॉन्टी (वय २१, रा. फुरसुंगी) व विशाल मारूती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) व ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उपनिरीक्षक राहुल घाडगे, रमेश चौधर व त्यांच्या पथकाने केली आहे.