Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar Environment News: उंच कंपाउंडच्या आडून नेमकं चाललंय तरी काय? पर्यावरण कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

Mahabaleshwar Environment News: महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीत १० ते १५ फुटांचे उंच पत्रे लावून वृक्षतोड व अनधिकृत बांधकामे होत असल्याचा आरोप केले जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पांचाळ यांची सर्वेक्षणाची मागणी आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 19, 2026 | 03:20 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Mahabaleshwar Environment News: महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथील नैसर्गिक संपदा, जैवविविधता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मात्र, महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील काही खासगी व व्यावसायिक मिळकतींभोवती १० ते १५ फुटांपर्यंत उंच पत्रे तसेच उंच वॉल कंपाउंड उभारण्यात आल्याचा आरोप सामाजिक व पर्यावरण बचाव कार्यकर्ते सूर्यकांत (बाळासो) पांचाळ यांनी केला आहे. उंच आणि अपारदर्शक पत्रे तसेच भिंतींच्या आडून नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची प्रशासनाने तातडीने तपासणी करावी, अशी मागणी पांचाळ यांनी जिल्हाधिकारी तसेच महाबळेश्वर नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

महाबळेश्वर परिसरातील पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेता मिळकती भोवती करण्यात येणाऱ्या कुंपणांबाबतच्या नियमांची तपासणी होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी उंच पत्रे आणि भिंतींमुळे आतील भाग पूर्णपणे झाकला जात असल्याने संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांची अथवा विकासकामांची माहिती सहजपणे उपलब्ध होत नसल्याचे पांचाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.वृक्षतोड, उत्खनन अन् अनधिकृत बांधकामाची शक्यता?

उंच पत्रे व कंपाउंडच्या आडून रात्रीच्या वेळी वृक्षतोड करणे, जुन्या वृक्षांच्या मुळांना नुकसान पोहोचविणे, डोंगरउतार कापणे, मातीचे उत्खनन करणे, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये बदल करणे किंवा परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करण्यासारखे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा पांचाळ यांनी केला आहे. त्यामुळे अशा सर्व मिळकतींची प्रत्यक्ष पाहणी करण्याबरोबरच संबंधित मिळकतींच्या बांधकाम परवानग्या, मंजूर नकाशे, बांधकामाची व्याप्ती आणि प्रत्यक्ष करण्यात आलेले बांधकाम यांची कागदोपत्री तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Supreme Court Recruitment 2026: १० वी पास उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज

नगरपरिषद प्रशासनाने सर्वेक्षण करावे

महाबळेश्वर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने उंच पत्रे किंवा अवाजवी उंच कंपाउंड असलेल्या सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करावे. संबंधित मिळकतींमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची कायदेशीरता तपासावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पांचाळ यांनी केली आहे.

तसेच नियमबाह्य आणि अपारदर्शक पत्र्यांची कुंपणे हटवून आवश्यकतेनुसार पारदर्शक जाळीचे कुंपण करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

NMC Medical Education: नॅशनल मेडिकल कमिशनचा मोठा निर्णय! २०२३ चे वैद्यकीय शिक्षणाचे ‘हे’ नियम तात्काळ प्रभावाने रद्द

जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी

महाबळेश्वर नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून संबंधित मिळकत धारकांना नोटिसा बजावाव्यात. पर्यावरणीय अथवा बांधकामविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायदा तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार (MRTP) कारवाई करावी, अशी मागणी पांचाळ यांनी केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाबळेश्वरमधील मिळकतींबाबत सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पांचाळ यांनी काय आरोप केला आहे?

    Ans: महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील काही खासगी व व्यावसायिक मिळकतींभोवती १० ते १५ फुटांपर्यंत उंच पत्रे आणि भिंती उभारून त्याच्या आडून वृक्षतोड, डोंगर कापणे व अनधिकृत बांधकामे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • Que: नियमांचे उल्लंघन आढळल्यास कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी आहे?

    Ans: पर्यावरण संरक्षण कायदा तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार (MRTP) कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Mahabaleshwar environment news rules violation illegal construction complaint sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • environment
  • Mahabaleshwar

संबंधित बातम्या

‘पावले शिस्तीची, दिशा राष्ट्रनिर्माणाची’! महाबळेश्वरमध्ये उत्साहात पार पडले RSS चे संचलन
1

‘पावले शिस्तीची, दिशा राष्ट्रनिर्माणाची’! महाबळेश्वरमध्ये उत्साहात पार पडले RSS चे संचलन

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
2

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.